मेष:-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी.

वृषभ:-

तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल.

मिथुन:-

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल.

कर्क:-

मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील.

सिंह:-

उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल.

कन्या:-

प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्‍या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. प्रलोभनाला भुलू नका.

तूळ:-

आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला  वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे.

वृश्चिक:-

जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल.

धनू:-

हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील अरसिकता काढून टाकावी.

मकर:-

कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल.

कुंभ:- 

पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. नवीन लोकांच्यात मिसळावे.

मीन:-

सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope today 26 april 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr