आजचं राशीभविष्य, बुधवार २९ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तीला साधक बाधक विचार करावा लागेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

आपल्या हिंमतीने सर्वांची दाद मिळवाल. मनातील इच्छा पूर्णत्वास येईल. सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल. जिद्दीने कामे तडीस न्याल. कौटुंबिक वातावरण हलके फुलके ठेवाल.

वृषभ:-

नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल. सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे. जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक कराल. कुटुंबात वैचारिक देवाणघेवाण होईल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.

मिथुन:-

हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. नियम मोडून चालणार नाहीत. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो.

कर्क:-

अचानक धनलाभाची शक्यता. कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. नवीन नियम पाळताना कसरत करावी लागेल. सहकार्‍यांना मदतीचा हात पुढे कराल.

सिंह:-

घरातील मोठ्यांचा आधार मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. ओळखीतून रखडलेली कामे मार्गी लागतील. सहकार्‍यांच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

कन्या:-

कामात चंचलता आड येऊ शकते. वेळेचे योग्य पालन करावे. नियोजनबद्ध कामे आखावीत. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता.

तूळ:-

करमणुकीतून नवीन गोष्टी शिकाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आशावादी दृष्टीने कामाकडे पहावे. घरात तुमचे प्रभुत्व राहील. कलेची आवड जोपासाल.

वृश्चिक:-

आर्थिक गरज भागेल. गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी. जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल. जवळचा प्रवास चांगला होईल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते.

धनू:-

साधक बाधक विचार करावा लागेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. हित शत्रूंवर जय मिळवाल. व्यवसायातील विरोधी हालचाली लक्षात घ्या. विवेक बुद्धीचा योग्य वापर करावा.

मकर:-

तुमच्यातील धाडस वाढेल.  योग्य व नियोजन पूर्व कामे आखावीत. दूरदृष्टी ठेवून वागावे. चोख कामे करण्याकडे कल राहील. कौटुंबिक बाबतीत निराशा झटकून टाका.

कुंभ:-

योग्य व्यावहारिक ज्ञान वापरावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. फटकळपणे बोलणे टाळावे. अति स्पष्टता बरी नव्हे.

मीन:-

कामाला अधिक उत्साह येईल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. व्यावसायिक चिंता दूर कराव्यात. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. वाढत्या व्यापामुळे व्यस्त राहाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 29 june 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
Swapna Shastra : स्वप्नात ‘या’ जवळच्या व्यक्तींना पाहणे मानले जाते शुभ संकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी