केतुचे राशी परिवर्तन ठरणार ‘या’ राशींसाठी फलदायी; पुढील वर्षभरात मिळणार अनेक चांगल्या बातम्या

केतूच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार असला तरीही तीन राशींसाठी हे परिवर्तन लाभदायक ठरणार आहे.

Ketu zodiac change
जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत. (Photo : Jansatta)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत संक्रमण करतो. या राशी परिवर्तनाचा परिणाम थेट मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. तसेच हा बदल काहींसाठी भाग्यवान तर काहींसाठी अशुभ ठरतो. १२ एप्रिल २०२२ रोजी छाया ग्रह केतूने तूळ राशीत प्रवेश केला आहे, जी शुक्र ग्रहाची रास आहे. २०२३ पर्यंत केतू या राशीत विराजमान राहील. म्हणूनच केतूच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार असला तरीही तीन राशींसाठी हे परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

  • मकर

तुमच्या ११व्या घरात केतू ग्रहाचे भ्रमण झाले आहे, जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान आहे. त्यामुळे, तुम्हाला अनेक नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. व्यवसायात महत्त्वाची डील पूर्ण करू शकता. यामुळे तुम्हाला विशेष पैसे मिळू शकतात. त्याच वेळी, नोकरीमध्ये बढती आणि वाढीची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात.

जुलै महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांवर होणार कुबेराची कृपा; अचानक मोठा धनलाभ होण्याचे संकेत

  • कर्क

केतू ग्रहाने तुमच्या राशीपासून चौथ्या घरात भ्रमण केले आहे. जे सुख, माता आणि वाहनाचे स्थान असल्याचे म्हटले जाते, त्यामुळे केतू ग्रहाची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुमची बढती होऊ शकते. जे अविवाहित आहेत, ते लोक या काळात प्रेमसंबंधात येऊ शकतात. त्याच वेळी, आपण मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता किंवा आपण कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता.

  • कुंभ

केतू या ग्रहाने तुमच्या संक्रमण कुंडलीतून नवव्या घरात प्रवेश केला आहे. जे भाग्य आणि परदेश प्रवासाचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते. मेहनतीसोबतच नशीबही तुम्हाला साथ देईल. तसेच, तुम्ही जे काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. यावेळी, तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात भारत आणि परदेशातही प्रवास करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ketu zodiac change will be fruitful for 3 zodiac signs there will be a lot of good news over the next year pvp

Next Story
आजचं राशीभविष्य, मंगळवार २८ जून २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी