ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रह मकर राशीत भ्रमण करत आहे. सूर्यदेव प्रत्येक राशीत महिनाभर राहतात. मकर राशीनंतर सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा सूर्याची कुंभ संक्रांती असेल. १३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण होत आहे. त्याच दिवशी कुंभ संक्रांती साजरी केली जाईल. यासोबतच त्रिपुष्कर योग आणि प्रीति योगही या दिवशी तयार होत आहेत. त्यामुळे या दिवसांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कुंभसंक्रांतीचा महिमा शास्त्रात वर्णिलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशी तिथीपेक्षा कुंभ संक्रांतीचे महत्त्व अधिक आहे. धार्मिक मान्यतेनुसार कुंभसंक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणाऱ्या भाविकांना मोक्ष प्राप्त होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते. कुंभ संक्रांतीच्या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते असे म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभ मुहूर्त आणि पुण्यकाळ

वैदिक दिनदर्शिकेनुसार सूर्यदेवाचा कुंभ राशीत प्रवेश १३ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजून ४१ मिनिटांनी होईल. अशा परिस्थितीत कुंभ संक्रांतीचा शुभ काळ सकाळी ७ वाजून १ मिनिटांपासून सुरू होईल. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील. कुंभ संक्रांती पुण्यकाळाची वेळ ५ तास ३४ मिनिटे असेल, तर कुंभ संक्रांतीचा महा पुण्यकाळ सकाळी ७ वाजून १ मिनिटं ते ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. महा पुण्यकाळाचा कालावधी ०१ तास ५१ मिनिटे आहे.

Astrology 2022: कुंभ राशीत गुरु ग्रह अस्ताला जाणार, ‘या’ चार राशींना होणार विशेष लाभ

संक्रांतीच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर जल अर्पण करून सूर्यदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. यादरम्यान तुम्ही सूर्यदेवाच्या मंत्रांचाही जप करू शकता. तसेच या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्य ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने पुण्य मिळते आणि या दिवशी गहू, तांदूळ, ब्लँकेट, उबदार कपडे इत्यादी दान करू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh sankranti 2022 know muhurt pooja vidhi rmt