2 June 2022 Lucky Zodiac Signs: २ जून २०२२ रोजी गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. या दिवशी भगवान श्री हरीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. २ जून रोजी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींना प्रचंड फायदा होईल, तर काही राशींना नुकसान सहन करावे लागू शकते. २ जून २०२२ च्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष (Aries)

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. अतिउत्साही होणे टाळा.तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. पालकांचे सहकार्य मिळेल. अतिरिक्त खर्चामुळे काळजी वाटेल.

(हे ही वाचा: २०२४ पर्यंत कुंभ राशीत विराजमान असतील शनिदेव, ‘या’ राशींना होऊ शकतो लाभ)

वृषभ (Taurus)

मन प्रसन्न राहील. कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल. लेखन-बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

(हे ही वाचा: Shani Dev: ५ जूनपासून ‘या’ ३ राशींचे चमकू शकते भाग्य, शनिदेवाची असेल विशेष कृपा)

मिथुन (Gemini)

वाणीत गोडवा राहील. संयम राखण्याचा प्रयत्न करत रहा.दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. अनावश्यक वाद टाळा. मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात.

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना असते जास्त बोलण्याची सवय! अनेकदा करून घेतात स्वतःचं नुकसान)

कर्क (Cancer)

मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल.कौटुंबिक जीवन आनंदी राहील. राहण्याची परिस्थिती गोंधळलेली असू शकते. मनःशांती लाभेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. भावंडांशी वाद होऊ शकतो.

(हे ही वाचा: १२ जुलैपासून ‘या’ तीन राशींच्या लोकांवर राहील शनिची कृपादृष्टी; प्रत्येक कामात मिळणार यश)

सिंह (Leo)

मनःशांती राहील. नोकरीत अधिका-यांचे सहकार्य मिळेल.नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. आत्मविश्वास कमी होईल. मानसिक तणाव असू शकतो.

(हे ही वाचा: Shani Jayanti 2022: ३० वर्षांनंतर शनि जयंतीला बनतोय दुर्मिळ योग, ‘या’ ३ राशींना होऊ शकतो फायदा)

कन्या (Virgo)

मन प्रसन्न राहील. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल.कष्ट अधिक होईल. संभाषणात संतुलित रहा. मन चंचल राहील. आत्मविश्वास कमी होईल. वडिलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mata lakshmi special grace will be on these 6 zodiac signs on thursday 2 june ttg