Nag Panchami 2022 Date, Time And Significance: सनातन धर्मात पौराणिक काळापासून नागांची पूजा केली जाते. तसेच शंकराच्याही गळ्यात नाग आहे. त्यामुळे नागाची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी २ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी करण्यात येतेय. या दिवशी शंकर आणि पार्वतींसोबत नागदेवतेचीही पूजा केली जाते. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो. नागपंचमीच्या दिवशी तो काल सर्प दोषाची पूजा करू शकतो. जाणून घ्या पूजेचं महत्व आणि शुभ मुहूर्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षी नागपंचमीला दोन विशेष योगही तयार होत आहेत. २ ऑगस्टला शिव आणि सिद्धी योगात नागपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी संध्याकाळी ६.३९ पर्यंत शिवयोग राहील. तसेच यानंतर सिद्धी योग सुरू होईल. या योगांमध्ये नागांची पूजा केल्याने दुहेरी फळ मिळते.

नागपंचमीची पंचमी तिथी ही २ ऑगस्ट रोजी पहाटे ५.१३ वाजेपासून सुरू होणार आहे. नागपंचमी तिथी समाप्ती ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४१ वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. सकाळी ०६.०५ वाजेपासून ते सकाळी ०८.४१ वाजेपर्यंत नाग पंचमीच्या पूजेची मुहूर्त आहे.

आणखी वाचा : शनिदेवाचा वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश, या राशींवर सुरू झाला धैय्याचा प्रकोप

शिवशंकराच्या गळ्यात नागदेवतेला स्थान आहे. तसेच भगवान विष्णू देखील शेषनागावर विश्राम करतात. नागदेवाला पाताळ लोकमधील स्वामी मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपा राहते आणि त्यामुळे आपलं घरही सुरक्षित राहतं. नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कालसप्र योगातून मुक्ती मिळते.

नागपंचमीच्या पूजेची विधी
नागपंचमीच्या दिवशी काल सर्प दोष पूजेसोबत राहू दोषाचीही पूजा करता येते. नागपंचमीच्या दिवशी लोक भिंतीवर नागाचा आकार करून पूजा करतात. तसेच या दिवशी सापाला दूध अर्पण करण्याचा कायदा आहे. नागदेवतेच्या पूजेसाठी नागदेवतेचे चित्र किंवा मूर्ती पोस्टावर स्थापित करा. त्यानंतर नागदेवतेला आवाहन करावे. त्यांना हळद, दूध आणि लाह्या अर्पण करून तिलक लावावा. फुल नाग देवतेची कथा जरूर वाचा आणि शेवटी नागदेवतेची आरती करावी. या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागाचे चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची विशेष कृपा असते असे मानले जाते. आजच्या दिवशी नागदेवतेचं दर्शन होणं खूप शुभ मानलं जातं. पौराणिकात आजच्या दिवसाबाबत अनेक आख्यायिका आहेत.

आणखी वाचा : Shadashtak Yoga: सूर्य-शुक्रामुळे बनतोय षडाष्टक योग, या ३ राशींमुळे वाढू शकतात अडचणी

नागपंचमीचे महत्त्व
महत्त्व :
नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. तसेच जर कुंडलीत राहु आणि केतू पासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nag panchami 2022 date auspicious time and significance when is nagpanchami know the importance tithi and the shubh muhurta prp