नाव ज्योतिष ही ज्योतिषशास्त्राची अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणून घेता येते. नावाची काही अक्षरे ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानली जातात. ज्या लोकांचे नाव या अक्षरांनी सुरू होते ते खूप भाग्यवान असतात. त्यांना त्यांच्या जीवनात सर्व सुख आणि अपार संपत्ती मिळते. हे लोक हुशार आणि कष्टाळू देखील असतात आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करूनच दाखवतात.
ज्या लोकांचे नाव ‘अ’ अक्षराने सुरू होते:
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव A म्हणजेच ‘अ’ अक्षराने सुरू होते, ते खूप भाग्यवान असतात. अशी माणसे ठरवलेली गोष्ट पूर्ण करूनच दाखवतात. हे लोक गरीब घरात जन्मले असले तरी आपल्या मेहनतीने आणि हुशारीने भरपूर पैसा कमावतात. हे लोक चांगले आणि आरामदायी जीवन जगतात.
ज्या लोकांचे नाव ‘क’ अक्षराने सुरू होते:
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव K म्हणजेच ‘क, ख’ अक्षराने सुरू होते, ते लोक देखील जन्मतः भाग्यशाली असतात. या लोकांवर लक्ष्मीची कृपा असते. हे लोक भरपूर पैसे कमावतात. तसेच ते खूप लोकप्रिय असतात. त्याचे हसणे लोकांना त्याच्याकडे आकर्षित करते.
ज्या लोकांचे नाव ‘प’ अक्षराने सुरू होते:
असे लोक ज्यांचे नाव P म्हणजेच ‘प’ किंवा ‘फ’ अक्षराने सुरू होते, ते आनंदी आणि खूप चांगले मित्र असतात. या लोकांकडे भरपूर पैसा असतो आणि ते खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्याची विनोदबुद्धी सगळ्यांनाच आवडते.
ज्या लोकांचे नाव ‘स अक्षराने सुरू होते:
असे लोक ज्यांचे नाव S म्हणजेच ‘स’ किंवा ‘श’ अक्षराने सुरू होते, ते खूप टॅलेंडेड आणि मेहनती असतात. हे लोक खूप हुशार देखील असतात. हे लोक यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात. ते प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात आणि त्यामुळे ते त्यांच्या जीवनात अमाप पैसा, उच्च पद, लोकप्रियता, विलासी जीवन जगतात. हे लोक खूप श्रीमंत होतात आणि जगातील सर्व सुखसोयींचा उपभोग घेतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)