Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात धैर्यवान आणि उत्साही; मंगळाची असते विशेष कृपा

अंकशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे विश्लेषण केले जाते

numerology

ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि राशीच्या आधारे माणसाच्या कुंडलीचे विश्लेषण केले जाते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे विश्लेषण केले जाते आणि त्याचे भविष्य आणि वर्तमान देखील निश्चित केले जाते. आज आपण मूलांक ९ बद्दल बोलणार आहोत. ज्या लोकांचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ९ आहे. अंकशास्त्रानुसार हे लोक ऊर्जावान असतात. तसेच धैर्यवान आणि निर्भय असतात. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. मंगळ हा मूलांक ९ चा स्वामी आहे.

मूलांक ९ असलेले लोकं शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम असतात. त्यांचे जीवन काहीसे संघर्षमय असते. पण या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची ताकद असते. लोक कलात्मक स्वभावाचे असतात. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असतात. त्यांना कला आणि विज्ञानात जास्त रस असतो. मूलांक ९ असलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते खूप पैसे खर्च करतात. पण रिअल इस्टेटच्या बाबतीत हे लोक भाग्यवान ठरतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना पैसे मिळतात. त्यांच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. मात्र, ते खंबीरपणे सामोरे जातात. हे लोक धोका पत्करून पैसे कमवतात. एकूणच त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. प्रेमसंबंधात अडचणी येतात. कधीकधी रागामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो. वैवाहिक जीवन संकटांनी भरलेले आहे. मूलांक ९ असलेल्या लोकांना सामान्यतः अभियंता, डॉक्टर, राजकारण, पर्यटन किंवा वीज संबंधित कामात यश मिळते.

२२ फेब्रुवारीला कुंभ राशीत गुरु ग्रह होणार अस्त; पाच राशींना मिळणार करिअरमध्ये यश

मूलांक ९ असणाऱ्यांनी हनुमंताची पूजा करावी. यामुळे सर्व समस्या लवकर दूर होतील. घरामध्ये त्रास असेल तर मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडचा पाठ करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास आर्थिक समृद्धी, मान-सन्मान आणि कीर्ती प्राप्त होते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Numerlogy number 9 and mangal grah know about it rmt

Next Story
संपत्ती आणि वैभव देणारा शुक्र, गुरूच्या राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशीच्या लोकांना होऊ शकतो जबरदस्त धनलाभ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी