Numerology: ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या प्रकारे कुंडली पाहून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि आयुष्य यांबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, गुणांचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकावर विशिष्ट देवी-देवतेचा आणि ग्रहांची कृपा असते. आज आम्ही अशा एका मूलांकाच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर साक्षात आदिशक्ती देवी महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीची अखंड कृपा असते. या लोकांवर देवीआई सदैव प्रसन्न असते. त्यामुळे या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी पराभवाचा सामना करावा लागत नाही.

मूलांक ९

मूलांक ९ म्हणजे कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ हा उत्साह आणि ऊर्जेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे मूलांक ९ असलेले लोक स्वभावाने खूप उत्साही आणि धाडसी असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात तयार राहतात. तसेच हे लोक शिस्तप्रिय असतात आणि त्यांच्या तत्त्वांवर ठाम असतात. याच कारणामुळे असे लोक खूप चांगले व्यावसायिक होतात आणि आयुष्यात खूप प्रगती करतात. त्याशिवाय या मूलांकीचे लोक इतरांना प्रेरणा देतात.

मूलांक ९ वर आदिशक्तीचा आशीर्वाद

अंकशास्त्रानुसार, मूलांक ९ असलेल्या लोकांवर देवी महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीची अखंड कृपा असते. त्यामुळे या लोकांना पैसा, शिक्षण व करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येते. देवी लक्ष्मीच्या कृपेने यांच्याकडे कमी वयात पैसा कमावण्याची जिद्द निर्माण होते. हे लोक मेहनतीच्या बळावर सुख-संपत्ती मिळवतात. तसेच देवी सरस्वतीच्या कृपेने हे आपल्या शिक्षण आणि बुद्धीचा योग्य वापर करून, ध्येय साध्य करतात. तसेच देवी दुर्गेच्या कृपेने आपल्या आयुष्यातील संकटांवर मात करून आयुष्य सुखी करतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)