प्रत्येक महिन्यातील शुल्क पक्ष पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी पौर्णिमा असते. यानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होते. यावर्षी पौष महिन्यातील पौर्णिमा १७ जानेवारीला येत आहे. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, ध्यान, पूजा, जप-तप आणि दान केल्याने विशेष पुण्य मिळते. या दिवशी पवित्र नद्या आणि सरोवरात आस्थाने स्नान केलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचं पूजन केल्याने घरात सुख, समृद्धि आणि शांती येते. या दिवशी काही उपाय केल्यास घरातील आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पौष पौर्णिमा तिथी १७ जानेवारीला रात्री ३ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल आणि १८ जानेवारीला सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी संपेल. या वेळेदरम्यान लक्ष्मी देवींची पूजन करून कृपा मिळते, अशी मान्यता आहे.

  • पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजासह घराच्या दारावर तोरण लावणे शुभ मानले जाते. या दिवशी मुख्य दरवाजासह इतर दरवाजांवर आंब्याचे आणि अशोकाच्या पानांचे तोरण लावावे. यासोबतच दारावर स्वस्तिक बनवा. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते.
  • पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने अश्वमेध यज्ञासमान फळ मिळते असे ग्रंथात सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी यथाशक्ती आणि भक्तिभावाने दान करावे. गरीब आणि गरजूंना दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
  • देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आंघोळीनंतर पूजेच्या वेळी ११ कवड्या घेऊन लक्ष्मीजींसमोर ठेवा. यानंतर आईला हळदीचा तिलक लावावा. दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्यात.
  • पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र आणि व्यापारी यंत्राची स्थापना करावी. लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्यानंतर मातेला गुलाबी रंगाचे फूल अर्पण करावे.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paush pournime 2022 laxmi poojan muhurt and vidhi rmt