In the month of October, the planets transit will happen not once but as many as five times; What will be the effect? find out | Loksatta

ऑक्टोबर महिन्यात एक नाही तर तब्बल पाच वेळा होणार ‘या’ ग्रहांचे राशी परिवर्तन; कसा असेल यांचा प्रभाव? जाणून घ्या

वैदिक ज्योतिषानुसार ऑक्टोबर २०२२ ग्रहांच्या राशी परिवर्तनासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात सूर्यग्रहणासोबतच अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात एक नाही तर तब्बल पाच वेळा होणार ‘या’ ग्रहांचे राशी परिवर्तन; कसा असेल यांचा प्रभाव? जाणून घ्या
ऑक्टोबर महिन्यातील ग्रह संक्रमण (File Photo)

वैदिक ज्योतिषानुसार ऑक्टोबर २०२२ ग्रहांच्या राशी परिवर्तनासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात सूर्यग्रहणासोबतच अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. काही राशीच्या लोकांनी व्यवसाय आणि नोकरीमध्ये थोडे सावध राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही राशीच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यात कोणते ग्रह राशी बदलणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील ग्रह संक्रमण

  • २ ऑक्टोबरला बुध ग्रह कन्या राशीत मार्गी होणार आहे.
  • १६ ऑक्टोबरला मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल.
  • १८ ऑक्टोबरला शुक्र ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करेल.
  • २३ ऑक्टोबरला शनि ग्रह मकर राशीमध्ये मार्गी होईल.
  • २६ ऑक्टोबरला बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करेल.

तब्बल ५९ वर्षांनी तयार होत आहेत पाच शक्तिशाली राजयोग; उघडणार ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे दार

ऑक्टोबर महिन्यात राशी परिवर्तनाचा प्रभाव कसा असेल?

  • मंगळ संक्रमण

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. येथे तो १३ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. सर्व राशींच्या लोकांवर या राशी परिवर्तनाचा प्रभाव पडेल. मंगळाच्या या संक्रमणामुळे मिथुन राशीसह काही राशींसाठी हा महिना खूप चढ-उतार घेऊन येणार आहे.

  • सूर्य संक्रमण

ज्योतिषशास्त्रानुसार १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. १६ नोव्हेंबरपर्यंत सूर्य या राशीत राहील. अशा परिस्थितीत अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे. तूळ राशीसह अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे वातावरण असेल. या काळात या राशींच्या लोकांचा मान-सन्मान वाढेल.

पुढील २८ दिवस ‘या’ राशींच्या लोकांवर राहील मंगळाची कृपादृष्टी; नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रबळ योग

  • शुक्र संक्रमण

१८ ऑक्टोबरला शुक्र रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. येथे शुक्र ११ नोव्हेंबरपर्यंत विराजमान राहील. यावेळी सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह अनेक राशींसाठी सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे.

  • बुध संक्रमण

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल. १३ नोव्हेंबरपर्यंत तो या राशीमध्ये राहील. बुधाच्या या संक्रमणाने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन गोष्टी घडतील. या काळात या राशींच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीतही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2022 at 20:41 IST
Next Story
Chanakya Niti : हे धोकादायक गुण असलेल्या लोकांशी कधीही मैत्री करू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल