शनिदेवाची वाईट नजर आपले जीवन खराब करू शकते, पण शनि शुभ असेल तर तो भिकाऱ्याला राजा बनवू शकतो. कर्मानुसार फळ देणारा शनि देव ५ जूनपासून कुंभ राशीत प्रतिगामी आहे. ३० वर्षांनंतर, शनि कुंभ राशीत आहे. तो १४१ दिवस मागे फिरेल. या दरम्यान तो १२ जुलै रोजी मकर राशीत प्रवेश करेल. शनिच्या स्थितीतील हे मोठे बदल काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अत्यंत अशुभ सिद्ध होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष, वृषभ, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांसाठी प्रतिगामी शनि शुभ सिद्ध होईल. या लोकांना या काळात करिअर-व्यवसायात फायदा होईल. उत्पन्न वाढेल. त्यांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. यावेळी मकर, कुंभ आणि मीन राशीमध्ये शनिची साडेसाती सुरू आहे. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीवर धैय्याची दशा चालू आहे. अशा स्थितीत शनिची त्यांच्यावर विशेष नजर असेल आणि त्यांना अनेक बाबतीत समस्यांना सामोरे जावे लागेल. यादरम्यान, शनिचे मागे फिरणे त्यांच्या त्रासात भर घालणार आहे. अशा परिस्थितीत या लोकांनी सावध राहावे. तसेच शनिदेवाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करावेत.

तुम्हालाही उंचावरून पडण्याचे स्वप्न पडते का? जाणून घ्या यामागचा अर्थ काय

शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी आणि शनिची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो कारण शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. जर जास्त त्रास असेल तर हे उपाय रोज केल्याने खूप आराम मिळेल.

  • शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुम्ही शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करू शकता, परंतु मूर्तीसमोर कधीही उभे राहू नका, त्याऐवजी बाजूला पाहून तेल अर्पण करा.
  • शनि चालिसाचे पठण करा.

सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी पाहणे असते शुभ; होऊ शकतो धनलाभ

  • काळे तीळ, उडीद, काळे वस्त्र दान करा.
  • एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा, नंतर ते तेल शनि मंदिरात ठेवा. अशा प्रकारे छाया दान केल्यानेही खूप फायदा होईल.
  • शनीच्या त्रासातून मुक्त होण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सफाई कामगार, असहाय्य, गरीब लोकांना मदत करणे. त्यांना दान द्या. त्यांच्याशी आदराने बोला.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regressive saturn shani will be inauspicious for these zodiac signs relief can be obtained by taking this remedy pvp