स्वप्न पाहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्ती स्वप्नात स्वतःशी संबंधित काहीतरी पाहतो. कधी स्वप्नात आपण स्वतःला पाहतो तर कधी आपल्या आजूबाजूच्या लोकांशी किंवा ठिकाणं पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती स्वप्नात आपल्या कोणत्याही नातेवाईकांना पाहते तेव्हा त्याच्या मनात हे निश्चितपणे येते की या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो? चला तर मग जाणून घेऊया स्वप्नातील शास्त्रानुसार या जवळच्या व्यक्तींना स्वप्नात पाहण्याचा अर्थ काय आहे…
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
आईला स्वप्नात पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात आपल्या आईला पाहिले किंवा मिठी मारली तर ते शुभ स्वप्न मानले जाते. त्याच वेळी, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळणार आहे.
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
स्वप्नात आजोबांना पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात आजी-आजोबांप्रमाणे घरातील वडीलधारी मंडळी आशीर्वाद देताना दिसली तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या कामात लवकरच प्रगती मिळणार आहे.
स्वप्नात मित्र/मैत्रीण पाहणे
स्वप्नशास्त्र सांगते की अनेक वेळा स्वप्नात आपण आपले मित्र/मैत्रीण कुठेतरी बोलत किंवा फिरताना पाहतो. अशा स्थितीत स्वप्नात तुमचा बालपणीचा मित्र-मैत्रीण दिसले तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते.
आणखी वाचा : शिल्पा सोबतची लव्हस्टोरी उघड करण्यासाठी अक्षयला मिळाली होती लाखो रुपयांची ऑफर, पण…
स्वप्नात पती पाहणे
जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला स्वप्नात पाहिले तर ते आपल्या जीवनात नवीन आनंद आणि सुख येणार असल्याचे लक्षण मानले जाते.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)