ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते, तसेच सूर्याचे भ्रमणदेखील अत्यंत महत्वाचे मानले जाते. सूर्याच्या संक्रमणाचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. या आठवड्यात १७ सप्टेंबर २०२२ रोजी सूर्याचे भ्रमण होणार आहे. सूर्य आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण सहा राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. या सहा राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- वृषभ
सूर्याच्या संक्रमणानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. तुमचा संयम कमी होऊ देऊ नका. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, तसेच प्रगतीचे मार्ग खुले होतील. या काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
- सिंह
या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमचे मन प्रसन्न राहील. सरकारच्या मदतीने कोणतेही मोठे काम पूर्ण होईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबात मान-सन्मान वाढेल.
- कन्या
सूर्य भ्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण अधीर होऊ नका. या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मान-सन्मान मिळेल. शिक्षणाच्या बाबतीत लक्ष द्या.
- तूळ
सूर्याच्या संक्रमणानंतर तुमचे मन प्रसन्न राहील. सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुम्हाला एकामागून एक यश मिळेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- कुंभ
या काळात तुमची वाचनाची आवड वाढेल. तसेच, तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. प्रगतीचे मार्ग खुले होतील. उत्पन्न वाढण्याची आणि धनलाभ होण्याची शकता आहे.
- मीन
या काळात विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घ्यावी. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल. थांबलेले पैसे परत मिळतील. खर्च वाढतील पण त्यामुळे अडचण येणार नाही.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)