Shani Planet Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. कर्मफळ देणारे शनिदेव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संथ गतीने प्रवेश करतो आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी त्यांना सुमारे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे शनिदेवाने सुमारे ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला असून ते १२ जुलैपर्यंत येथेच राहतील, त्यानंतर काही दिवसांनी ते कुंभ राशीत प्रवेश करतील आणि २०२४ पर्यंत कुंभ राशीत राहतील. ज्याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, परंतु हे राशी परिवर्तन ३ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. जाणून घ्या कोणत्या आहेत या ३ राशी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी शनी ग्रहाचे राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकते. कारण तुमच्या ११ व्या भावात शनिदेवाचा प्रवेश झाले आहे, ज्याला लाभ आणि उत्पन्नाचे घर म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. तसेच, या काळात तुम्ही अनेक नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकाल. या काळात तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या दहाव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रचंड प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तुमची इच्छित बदली कामाच्या ठिकाणी होऊ शकते. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. तुम्ही लोक शनी ग्रहाशी संबंधित निळा रत्न परिधान करू शकता. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : मायावी ग्रह राहू नक्षत्र बदलणार, या राशींना चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग

वृषभ: तुमच्या गोचर कुंडलीतून शनिदेव दहाव्या भावात प्रवेश करत असून २०२४ पर्यंत येथेच राहतील. ज्योतिषशास्त्रात या स्थानाला कार्यक्षेत्र आणि नोकरीचे स्थान असे म्हणतात. म्हणून यावेळी तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. म्हणजे तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठा मिळू शकेल. व्यवसायात नवीन कल्पना घेऊन यश मिळेल. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तसेच तुमच्या नवव्या घराचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि शनी यांच्यात मैत्रीची भावना आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : २४ तासांनंतर शनिदेव होणार वक्री, ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीबाचे दरवाजे उघडणार

धनु : शनिदेवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण २९ एप्रिल रोजी शनिदेवाचे राशी परिवर्तन होताच तुम्हा लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. दुसरीकडे, शनी ग्रह तुमच्या तिसऱ्या घरामध्ये म्हणजेच पराक्रमी घरामध्ये प्रवेश करत आहे. म्हणून, या काळात तुम्ही तुमच्या शौर्यामध्ये आणि धैर्यात वाढ पाहू शकता. यासोबतच शत्रूंवर विजय मिळवून कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळेल. आपण कोणत्याही जुन्या रोगापासून मुक्त होऊ शकता. जर तुम्ही शनिदेवाशी संबंधित (लोखंड, तेल, दारू) व्यवसाय करत असाल किंवा करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे तुम्हाला नवीन ऑर्डरमधून चांगले पैसे मिळतील. या दरम्यान, तुम्ही नीलमणी घालू शकता, जे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev changed zodiac sign good days started for these 3 zodiac signs according to astrology prp