shani planet transit to capricorn for 6 months luck of 3 zodiacs will shine | Loksatta

१७ जानेवारीपासून ‘या’ राशींचे सुरू होतील ‘अच्छे दिन’; शनिदेवाची असेल विशेष कृपा, मिळेल अफाट पैसा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाने जुलैमध्ये मकर राशीत प्रवेश केला आहे आणि १७ जानेवारीपर्यंत ते याचं राशीत विराजमान राहतील. शनि ग्रहाच्या स्थितीमुळे ३ राशीच्या लोकांसाठी चांगला पैसा आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.

१७ जानेवारीपासून ‘या’ राशींचे सुरू होतील ‘अच्छे दिन’; शनिदेवाची असेल विशेष कृपा, मिळेल अफाट पैसा
फोटो(संग्रहित फोटो)

Shani Transit In Makar 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाने जुलैमध्ये मकर राशीत प्रवेश केला होता आणि १७ जानेवारी २०२२ पर्यंत या स्थितीत विराजमान राहतील. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना या काळात विशेष धन मिळू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

मीन राशी

मकर राशीत शनीचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून अकराव्या घरात प्रवेश करत आहेत. जे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्ही अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवू शकाल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील तयार होतील. तसेच, व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. दुसरीकडे, शनि ग्रह देखील तुमच्या बाराव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. तसेच नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. या काळात तुम्ही प्रवासातून पैसे कमवू शकाल. यावेळी तुम्हाला कोर्ट केसमध्ये यश मिळू शकते.

( हे ही वाचा: दिवाळीपूर्वी शनिदेव ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकवणार; मिळेल बक्कळ संपत्तीसह नशिबाची मजबूत साथ)

वृषभ राशी

शनि मकर राशीत प्रवेश करताच तुमचे चांगले दिवस सुरू होतील. कारण तुमच्या नवव्या घरात शनिदेवाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. दुसरीकडे, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि शुक्र ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनीचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

धनु राशी

शनिदेवाचे स्वतःच्या राशीत होणारे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण धन आणि वाणीचे घर मानल्या जाणाऱ्या तुमच्या राशीतून शनिदेवाने द्वितीय घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच व्यवसायात चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. त्याच वेळी, आपण या काळात उधार पैसे मिळवू शकता. तसेच व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला यावेळी भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरू करू शकता. दुसरीकडे, ज्या लोकांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ चांगला जाणार आहे. यासोबतच तुमची रखडलेली कामेही या काळात पूर्ण होतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Chanakya Niti: स्वतःच्या आयुष्याचा बॉस बनण्यासाठी हे नियम पाळा

संबंधित बातम्या

१८ जानेवारी २०२३ पासून ‘या’ राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? शनिसह बुध देणार बक्कळ धनलाभ व श्रीमंतीची संधी
माता लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींचे भाग्य अचानक चमकणार? २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
२०२३ मध्ये राहू ग्रह उलट दिशेने फिरणार; ‘या’ ३ राशीच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता
२८ डिसेंबर पासून ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? बुधाचा प्रवेश मिळवून देणार अपार श्रीमंती
१६ जानेवारीपर्यंत ‘या’ ३ राशींवर असेल शनिदेवाची वाकडी नजर; होऊ शकते प्रचंड धनहानी! वेळीच व्हा सावध

व्हिडिओ

ताज्या बातम्या
उलट चालण्याचे फायदे माहित आहेत का? कंबरदुखी, गुडघेदुखीवर ठरते सोपा उपाय; लगेच जाणून घ्या कारण
“भीमा तू होतास…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त वनिता खरातची खास पोस्ट
Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न
पुणे : जेवणातून गुंगीचे औषध देऊन नोकराने केली २३ लाख ९८ हजार रूपयांची चोरी
प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”