Surya-Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा राजा सूर्य हा नवग्रहांतील सर्वांत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य हा आत्मा, मान- सन्मान, पद-प्रतिष्ठेचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या होतो. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. दरम्यान, आता १४ मार्च २०२५ रोजी (आज) सूर्याने मीन राशीत प्रवेश केला असून मीन राशीत आधीपासूनच शुक्र ग्रह विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीत सूर्य-शुक्राची युती निर्माण होईल. ज्यामुळे शुक्रादित्य हा शुभ योग निर्माण होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशी होणार मालामाल

वृषभ

सूर्य-शुक्राच्या युतीचा प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. भौतिक सुख मिळेल.

धनु

सूर्य आणि शुक्राच्या युतीच्या प्रभावाने धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्यही चांगले राहिल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल.

मीन

सूर्य-शुक्राची युती मीन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्यही चांगले राहिल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल.

(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra aditya rajyog in meen the three zodiac signs will get happiness love and promotion sap