११ नोव्हेंबरला शुक्रदेव आपले स्थान बदलून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करतील. या संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांचे ‘अच्छे दिन’ सुरु होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार ११ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी शुक्रदेव संक्रमण करतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रदेव हे शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु आहेत. शुक्र संपत्ती, समृद्धी, वैभव, प्रेम आणि सौंदर्य दर्शवते. शुक्रदेवाच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मकर

मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीतील पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे नोकरदारांसाठी हा कालावधी अनुकूल असू शकतो. त्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तसेच, पगारही वाढू शकतो. या काळात वैयक्तिक आयुष्यही चांगले राहण्याची संभावना आहे. सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबरच आर्थिक लाभही होऊ शकतो.

Guru Margi 2022 : २४ नोव्हेंबरनंतर काहींना मिळू शकते शुभ वार्ता, तर काहींच्या अडचणीत होणार वाढ

  • कुंभ

शुक्र हा कुंभ राशीच्या कुंडलीतील चौथ्या घराचा स्वामी आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वेळोवेळी प्रोत्साहन मिळू शकते आणि पगारही वाढू शकतो.

  • तूळ

शुक्र हा तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीतील आठव्या घराचा स्वामी आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांना या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची संभावना असून गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो.

  • धनु

धनु राशीच्या लोकांच्या कुंडलीतील सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. निर्यातीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो.

Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

  • मीन

उच्च शिक्षणाशी संबंधित या राशीच्या लोकांना या काळात यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. सल्लागार म्हणून काम करत लोकांनाही चांगले परिणाम मिळू शकतात.

  • सिंह

शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. या काळात सिंह राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. काही व्यावसायिकांनाही या काळात फायदा होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar november 2022 venus transit in scorpio progress of these 6 zodiac signs financial gain pvp