हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. यंदा सोमवती अमावस्या ३० मे रोजी येत आहे. या दिवशी वट सावित्री व्रत आणि शनि जयंती देखील आहे. त्यामुळे यंदा सोमवती अमावस्येचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सोमवती अमावस्येला पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी अमावस्येला श्राद्ध करणे योग्य मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी दान आणि गंगेत स्नान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. शास्त्रामध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेल्या दानाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. त्याच वेळी, या दिवशी एकाच वेळी ६ शुभ योग तयार होत आहेत. चला जाणून घेऊया या शुभ योगांबद्दल आणि पूजेच्या शुभ मुहूर्ताबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवती अमावस्या तिथी आणि शुभ मुहूर्त

सोमवती अमावस्या – ३० मे २०२२, सोमवार

अमावस्या तिथी सुरवात- २९ मे २०२२ दुपारी ०२:५३ पासून

अमावस्या तिथी समाप्ती – ३० मे २०२२, दुपारी ०४:५९ पर्यंत

(हे ही वाचा: १२ जुलैपासून ‘या’ तीन राशींच्या लोकांवर राहील शनिची कृपादृष्टी; प्रत्येक कामात मिळणार यश)

वैदिक कॅलेंडरनुसार, सोमवारी सर्वार्थ सिद्धी योगात अमावस्या तिथी सुरू होईल. याशिवाय सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने तयार होणारे बुधादित्य राजयोग, वर्धमान, सुकर्मा आणि केदार हे शुभ योगही या दिवशी तयार होत आहेत. त्यामुळे ३० मे रोजी एकाच वेळी ६ शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी कर्मफळ देणारे शनिदेव स्वतःच्या कुंभात विराजमान राहतील. त्याच वेळी देवगुरु बृहस्पति, वृद्धी आणि ज्ञानाचा कारक देखील स्वतःच्या मीन राशीत राहील. या दोन ग्रहांच्या स्वतःच्या राशींमुळे कुंभ, मकर आणि मीन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तसेच, या राशींमध्ये अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्याही कामात यश मिळू शकते.

(हे ही वाचा: Shani Jayanti 2022: ३० वर्षांनंतर शनि जयंतीला बनतोय दुर्मिळ योग, ‘या’ ३ राशींना होऊ शकतो फायदा)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somvati amavasya is special there will be 6 auspicious coincidences according to astrology ttg