वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो किंवा युती बनवतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनिदेवाने आपली राशी बदलून मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्य देखील कर्क राशीत बसला आहे. या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण होत आहे. खरं तर आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या भावात बसले आहेत. त्यामुळे या संसप्तक योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु अशा ४ राशी आहेत ज्यांनी यावेळी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण शनी आणि सूर्यदेव यांच्यात वैराची भावना आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींच्या अडचणी वाढू शकतात आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन : संसप्तक योग तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत आयु स्थानाचा स्वामी शनिदेव आहे आणि तो माराकेश आहे. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. चेहऱ्यावर दुखापत होऊ शकते. अपघात होऊ शकतो. डोळ्याची शस्त्रक्रिया होऊ शकते. तसेच यावेळी लहान भावंडांमध्ये काही वाद होऊ शकतो. वडिलांना त्रास होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे. विवाह जीवनासाठी चांगले आहे. या वेळी व्यवसायही ठीक राहील.

आणखी वाचा : ‘या’ तारखांना जन्मलेले लोक प्रेम विवाहावर विश्वास ठेवतात!

सिंह: संसप्तक योग तुम्हा लोकांना थोडासा हानीकारक ठरू शकतो. कारण तुमच्या आरोहीचा स्वामी सूर्य १२ व्या भावात विराजमान आहे, ज्यावर शनिदेवाची दृष्टी पडत आहे. या राशीच्या वृद्धांना हा काळ थोडा जास्त धोकादायक वाटू शकतो. काही आजार होऊ शकतो. हाड मोडले जाऊ शकते. यावेळी व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. तसेच कोर्ट केसेसमध्ये गाफील राहू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता.

धनु: संसप्तक योग तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. कारण तुमच्यावरही साडेसाती चालू आहे. तुमच्या गोचर कुंडलीत शनिदेवाची दृष्टी सूर्य आणि बुधावर आहे. त्यामुळे वडिलांना त्रास होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे बोलताना शब्दांकडे लक्ष द्या. तसेच शनीच्या बीज मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शनिदेवाशी संबंधित वस्तू दान करा.

आणखी वाचा : सूर्य देवाचा कर्क राशीत प्रवेश, या ३ राशींचे चांगले दिवस सुरू होतील

कुंभ : संसप्तक योग तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत जोडीदाराच्या घराचा स्वामी षष्ठ स्थानात विराजमान आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. भागीदारीच्या कामात नुकसान होऊ शकते. तसेच जर तुम्हाला आता भागीदारीचे काम सुरू करायचे असेल तर आता थांबवा. तुम्ही लोकांनी शनी आणि मंगळाच्या बीज मंत्रांचा जप करावा. त्यामुळे कमी त्रास होऊ शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya and shani made samsaptak yoga can start bad time for these zodiac sign prp