Surya guru gochar 2025: ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला शुभ किंवा अशुभ प्रभाव पाहायला मिळतो. नवग्रहात सूर्याला खूप महत्वपूर्ण मानले जाते. तसेच दुसरीकडे देवगुरू बृहस्पती जवळपास एका राशीत एक वर्ष राहतो. त्यामुळे त्याला संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागतो.
अशातच दोन्ही ग्रहांच्या परिवर्तनामुळे २०२५ मध्ये षडाष्टक राजयोग निर्माण होईल. खरं तर षडाष्टक राजयोग ज्योतिषशास्त्रामध्ये विनाशकारी मानला जातो. परंतु हे शुभ ग्रह एकमेकांपासून १५० डिग्री अंतरावर असल्यामुळे येणाऱ्या नव्या वर्षांत काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन एकमेकांपासून १५० डिग्री अंतरावर किंवा एकमेकांपासून ६ व्या आणि ८ व्या स्थानी असतात तेव्हा षडाष्टक योग निर्माण होतो. हा योग खूप विनाशकारी मानला जातो. पण अनेकदा हा सकारात्मक प्रभावह देतो. त्यामुळे हा योग येणाऱ्या वर्षात काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर मानला जाईल.

षडाष्टक राजयोग करणार कमाल

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

हेही वाचा: ‘या’ पाच राशींचे चमकणार भाग्य; डिसेंबरमध्ये शुक्र करणार दोन वेळा राशी परिवर्तन, देणार बक्कळ पैसा

मकर

षडाष्टक राजयोग मकर राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya guru gochar 25 the coming new year will earn a lot of money surya guru will give position prestige and money sap