राहूचे नक्षत्र परिवर्तन चमकावणार 'या' राशींचे नशीब; होणार धन-संपत्तीचा वर्षाव | The fate of these zodiac signs that will make Rahu's constellation change; There will be a flood of wealth | Loksatta

राहूचे नक्षत्र परिवर्तन चमकावणार ‘या’ राशींचे नशीब; होणार धन-संपत्तीचा वर्षाव

८ दिवसांनी राहु भरणी नक्षत्रात प्रवेश करेल. पुढील वर्षी २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत राहू या नक्षत्रात राहील. याचा परिणाम सर्व राशींवर होईल.

राहूचे नक्षत्र परिवर्तन चमकावणार ‘या’ राशींचे नशीब; होणार धन-संपत्तीचा वर्षाव
जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. (File Photo)

ज्योतिषशास्त्रात राहुला पापी ग्रह मानले जाते. राहू-केतू यांना छाया ग्रह असेही म्हणतात. ज्या व्यक्तीवर राहू-केतूचा वाईट प्रभाव पडतो, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. १४ जून रोजी राहू ग्रह नक्षत्र बदलणार आहे. सध्या राहू मेष राशी आणि कृतिका नक्षत्रात आहे. ८ दिवसांनी राहु भरणी नक्षत्रात प्रवेश करेल. पुढील वर्षी २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत राहू या नक्षत्रात राहील. याचा परिणाम सर्व राशींवर होईल.

भरणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची राशी मेष आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि या नक्षत्राचा स्वामी शुक्र ग्रह आहे. अशा स्थितीत या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीवर मंगळ आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव पडतो. यामुळे हे लोक धाडसी, निर्भय, सुखाची लालसा ठेवणारे, शब्दाचे पक्के आणि आकर्षक असतात. राहुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश आणि पुढील ८ महिने या नक्षत्रात राहणे, तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. या दरम्यान त्यांना पैसा मिळेल, प्रगती होईल. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ

  • मेष

राहुच्या नक्षत्र बदलामुळे मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक स्थितीत फायदा होईल. प्रगती करता येईल. उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

  • वृषभ

भरणी नक्षत्रात राहूचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांना धनसंपत्ती देईल. त्यांना लाभाच्या अनेक संधी मिळतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती कराल. पदोन्नती होईल. प्रवासातून तुम्हाला भरपूर पैसे मिळतील.

तुम्हालाही उंचावरून पडण्याचे स्वप्न पडते का? जाणून घ्या यामागचा अर्थ काय

  • तूळ

राहूच्या नक्षत्राच्या बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. तुम्ही सहलीला जाऊ शकता. आनंदाचा काळ जाईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आजचं राशीभविष्य, मंगळवार, ७ जून २०२२

संबंधित बातम्या

२०२३ मध्ये शनिदेव करणार 3 मोठे नक्षत्र बदल! ‘या’ राशींना मिळू शकतो धनलाभ तर ‘या’ राशींना अपार कष्ट
नवरात्रीनंतर सूर्य देव बदलणार राशी; ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक बदलणार
अडीच वर्षांनी शनिदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
२०२३ मध्ये राहू ग्रह उलट दिशेने फिरणार; ‘या’ ३ राशीच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता
१८ जानेवारी २०२३ पासून ‘या’ राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? शनिसह बुध देणार बक्कळ धनलाभ व श्रीमंतीची संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश