Vastu Tips For Hanging Clothes : वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत जे तुमच्या घरात शांतता, सुख, सकारात्मकता निर्माण करण्यास मदत करतात. पण, हे नियम न पाळल्यास घरात वास्तु दोष निर्माण होतो, ज्यामुळे विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. काही लोक वास्तुनियम पाळतात, पण काही वेळा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे घरात कलह निर्माण होतो. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरापासून बेडरुम, बाथरुमपर्यंत अनेक नियम सांगितले आहेत; तसेच घराच्या दरवाजाबाबतही अनेक नियम सांगितले आहेत, जे फॉलो करून तुम्ही घरात सकारात्मकता निर्माण करू शकता. बऱ्याच घरात दरवाजामागे कपडे लटकवण्याची सवय असते. पण, ही सवय वास्तुशास्त्रानुसार वाईट आहे की चांगली याविषयी जाणून घेऊ….

दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं चांगलं की वाईट

वास्तुशास्त्रानुसार, लक्ष्मी माता घरात दरवाजाने आत प्रवेश करते, त्यामुळे घराच्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. अशाने दरवाजावर काहीही लटकवल्याने किंवा अडचण दिसल्यास देवी लक्ष्मी निराश होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, अशाने घरात आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. हळहळू प्रत्येक कामात अडचणी येऊ शकतात, घरातील शांतता कमी होते. यामुळे घरात दरवाजावर कपडे लटकवण्याची सवय योग्य नाही, कारण यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नकारात्मकतेत बदलू शकते.

घरात ‘या’ पद्धतीने ठेवा कपडे

वास्तुशास्त्रात घरात कपडे लटकवण्याबाबतच्या निमयांचा उल्लेख आहे. पश्चिम आणि दक्षिण दिशेला कपडे लटकवणं योग्य आहे, तुम्ही कधीही पूर्व आणि उत्तर दिशेने कपडे लटकवू नका. तसेच कपडे लटकवण्यासाठी दरवाजाची जागा निवडू नका. या निमयांचे पालन करून तुम्ही घरात शांतता प्रस्थापित करू शकता, तसेच वास्तूदोषही दूर करू शकता.