वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा काही शुभ तर काही अशुभ योग तयार होत असतात. शुक्रदेवाने ११ नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला असून यामुळे चार राशींना दरिद्र योगातून मुक्ती मिळाली आहे. त्याचबरोबर या राशींसाठी धनलाभ आणि यशाचे प्रबळ योग तयार होत आहेत. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • वृषभ

शुक्रदेवाचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण या संक्रमणामुळे ‘पार्श्व योग’ तुटला आहे. म्हणूनच या काळात या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. तसेच व्यापार विस्तार होण्याचीही संभावना आहे. या काळात हे लोक आपल्या कुटुंबियांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांबरोबरचे नातेसंबंध यावेळी सुधारू शकतात. या काळात या लोकांचे आरोग्यही उत्तम राहील. एखाद्या जुन्या आजारापासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

१२ वर्षांनी तयार होणाऱ्या ‘नवपंचम’ योगामुळे ‘या’ राशींना आकस्मिक धनलाभाची संधी; पाहा तुम्हीही आहात का नशीबवान

  • कर्क

शुक्राच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. हा बदल या लोकांच्या करिअर आणि व्यायसायाच्या दृष्टीने लाभदायक सिद्ध होऊ शकतो. शुक्रदेव या राशीच्या कुंडलीतील सुख आणि लाभाच्या घराचे स्वामी आहेत. यावेळी या लोकांना भौतिक सुख मिळू शकते. तसेच, जे लोक मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी हा शुभ काळ ठरू शकते. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभाची शक्यता देखील आहे. या काळात गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.

  • सिंह

शुक्राच्या राशी परिवर्तनानंतर या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. तसेच या लोकांना पाश्विक योगापासून मुक्ती मिळाली आहे. शुक्र ग्रह या राशीच्या चौथ्या घराचा स्वामी आहे. त्यामुळेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. तसेच, या लोकांना शेअर बाजारात फायदा होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus planet transit in scorpio these zodiac sign luck can shine shukra vrushchik pvp