महालक्ष्मी सण आटोपून पुण्याकडे परतत असलेल्या कुटुंबाच्या गाडीला मालमोटारीने समोरून धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. शहरापासून जवळच औंढा रस्त्यावरील पुंगळा शिवारात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला.
मीना सुभाष घुगे ही महिला सासरी महालक्ष्मी सणानिमित्त मेडसी (जिल्हा वाशिम) येथे आली होती. सणानंतर दोन दिवस िहगोलीस माहेरी राहिल्यानंतर आपल्या मावसभावाच्या गाडीतून पुण्यास निघाली होती. औंढय़ानजीक येळी-केळी येथील नातेवाईक शिर्डीस शस्त्रक्रियेसाठी जाणार असल्याने तेही येळी-केळी येथून इनोव्हा गाडीत (एमएच २० बीटी ६८१०) बसले. दुपारी एकच्या सुमारास पुंगळा पाटीजवळ जिंतूरकडून येणाऱ्या मालमोटारीशी (एपी १६ टीवाय ७२५७) इनोव्हाची पुलावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात मीना सुभाष घुगे व अरुणा रघुनाथ नागरे या दोघी जागीच ठार झाल्या, तर रघुनाथ नागरे, अनिता घोळवे, रीतेश घोळवे व गाडीचा चालक राजकुमार जोंधळे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना परभणी येथे हलविण्यात आले. अपघात एवढा भीषण होता, की अपघातानंतर इनोव्हातून मृत व जखमींना बाहेर काढणेही अवघड झाले होते. या वेळी घटनास्थळी दाखल झालेले महामार्ग पोलीस गुलाब भिसे, सुधाकर कुटे, अनिल कटारे यांनी इनोव्हाचा वरील पत्रा काढून जखमींना बाहेर काढले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2015 रोजी प्रकाशित
मालमोटार-मोटारीची धडक; दोन महिला ठार, ४ जखमी
महालक्ष्मी सण आटोपून पुण्याकडे परतत असलेल्या कुटुंबाच्या गाडीला मालमोटारीने समोरून धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले.
Written by बबन मिंडे
First published on: 27-09-2015 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women died in road accident