Nissan ने नवीन Magnite कार लॉच केली आहे आणि पहिल्या १०,००० ग्राहकांना ही कार ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्रास्ताविक किंमतीत(introductory price ) उपलब्ध आहे. Magnite कारमध्ये १-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड हा एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकारमध्ये १-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ही SUV सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि जपानी निर्मात्याने डाव्या हाताने चालवता येईल अशा मॅग्नाइट कारच्या निर्यातीची पुष्टी केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ निसान मॅग्नाइट: डिझाइन (2024 Nissan Magnite: Design)

निसानने मॅग्नाइटला टच-अप दिले आहे जे प्रीमियम आणि आक्रमक(aggressive) दिसते. कारच्या फ्रंट ग्रिलला प्रीमियम लुक देण्यासाठी नवीन थिक क्रोम इन्सर्ट केला आहे. तर फ्रंट बंपर आक्रमक(aggressive) दिसण्यासाठी चंकी सिल्हवर रंगाचा बंपर जोडला आहे. कारला विशिष्ट DRLs आणि फॉग लॅम्पसह अपडेट केलेले एलईडी हेडलॅम्प दिले
आहेत. याला १६-इंच मिश्रधातूच्या चाकांचा एक नवीन सेट दिला आहे आणि दारांच्या खालच्या भागावर प्रमुख अतिरिक्त चांदीचे क्लेडिंग मिळते. सिल्व्हर फिनिश बंपरसह त्याच्या सुंदर डिझाइन आहेत. निसानने एलईडी टेल लॅम्प्सची नव्याने रचना केली आहे.

हेही वाचा – डिस्काउंटसाठी दिवाळीची वाट पाहताय? त्याआधीच घरी आणा ‘ही’ जबरदस्त बाईक, हिरो देतेय ‘या’ बाईक्स आणि स्कूटरवर भरघोस सूट

२०२४ निसान मॅग्नाइट: इंटिरियर्स (2024 Nissan Magnite: Interiors)

मॅग्नाइटला सनराइज कॉपर ऑरेंज फिनिश इंटीरियर मिळते जे लॅम्बोर्गिनी-प्रेरित आहे. स्टीयरिंग व्हील ब्लॅक आऊट असले तरी डॅशबोर्डची रचना तशीच आहे.

२०२४च्या व्हर्जनमध्ये ब्रँड की, केबिनमध्ये AC स्विच, सॉफ्ट-टच लेदरेट डॅशबोर्ड आणि डोअर पॅनेल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, केबिन एअर प्युरिफायर आणि ३६० डिग्री कॅमेरा यांसारख्या काही नवीन वस्तू मिळतात. मॅग्नाइट ६ एअरबॅगसह सुरक्षित आहे.

हेही वाचा – Diwali Sale: होंडा कंपनीकडून ‘या’ कार्सवर मिळणार तब्बल १ लाखापर्यंत डिस्काउंट, दिवाळी सेलची खास ऑफर जाणून घ्या

२०२४निसान मॅग्नाइट: इंजिन, किंमत (2024 Nissan Magnite: Engines, Price)

२०२४ मॅग्नाइटमध्ये १-लिटरचे पेट्रोल इंजिन आहे जे ७१ bhp आणि ९६ Nm टॉर्क तयार करते आणि दुसरीकडे १-लिटरचेटर्बो पेट्रोल इंजिन आहे जे ९९ bhp आणि १६० Nm टॉर्कसह राखून ठेवते. या कारचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल किंवा AMT सह जोडलेले आहे तर दुसरीकडे ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT ऑटोमॅटिक देखील उपलब्ध आहे. मॅग्नाइट सध्या Tata Nexon, Maruti Suzuki Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra 3X0 आणि Maruti Suzuki Fronx यांच्याना टक्कर देत आहे.

निसान मॅग्नाइट१ लिटर एनए एमटी१-लिटर एनए एएमटी१-लिटर टर्बो एमटी१-लिटर टर्बो सीव्हीटी
व्हिसिया (Visia)रु ५.९९ लाखरु ६.६० लाख
व्हिसिया+ (Visia +)रु. ६.४९ लाख
अॅक्सेंटा (Acenta)रु, ७.१४ लाखरु. ७.१४ लाखरु.९.७९ लाख
एन – कनेक्ट (N-Connect)रु. ७.८६ लाखरु. ८.३६ लाखरु. ९.१९ लाखरु. १०.३४ लाख
टेकना (Tekna)रु. ८.७५ लाखरु. ९.२५ लाखरु. ९.९९ लाखरु. ११.१४ लाख
टेकना प्लस (Tekna+)Tekna+ Rरु. ९.६० लाखरु. १०.३५ लाखरु. ११.५० लाख
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2024 nissan magnite launched at rs 599 lakh the special introductory price is available only to the first 10 000 purchasers snk