बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक स्कूटरचे पर्यायही सातत्याने वाढत आहेत. अनेक कंपन्या आपल्या नवनव्या बाईक भारतीय बाजारात दाखल करत असतात. आता इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. बजाज ऑटोने त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतकचे नवीन व्हेरिएन्ट लाँच केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak 2901 लॉन्च केली आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा अगदी कमी किमतीत आणि ग्राहकांना परवडेल असा दरात हि इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे. ही स्कूटर पाच आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली जात आहे. सुरक्षेसाठी कंपनीने यामध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय असेल खास पाहा

ही नवीन स्कूटर मजबूत मेटल बॉडीमध्ये बनवण्यात आली आहे, यात डिजिटल कन्सोल आहे, ज्यामुळे याला हाय क्लास लुक देण्यात आला आहे. याशिवाय स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स आणि डिझायनर टेललाइट्स देण्यात आले आहेत. यात इको आणि स्पोर्ट्स असे दोन रायडिंग मोड असतील. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर सुमारे १२३ किमी धावेल, असा दावा कंपनीने केला आहे.

(हे ही वाचा : मायलेज २५.७५ किमी; ‘या’ ५ सीटर कारनं केलं सर्वाचं मार्केट जाम! Wagon R ला ही टाकलं मागे, देशात तुफान मागणी, किंमत…)

बजाज चेतक 2901 मध्ये हिल होल्ड असिस्टचे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य उच्च उंचीच्या रस्त्यावर स्कूटर नियंत्रित करण्यास रायडरला मदत करते. ही स्कूटर रिव्हर्स मोडच्या फीचरसह सादर केली जात आहे, ज्यामुळे महिला आणि वृद्धांना ती चालवणे सोपे होईल. चेतक 2901 मध्ये रंगीत डिजिटल कन्सोल, अलॉय व्हील आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासह रायडर आराम आणि सुविधा वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक वैशिष्ट्यांसह येते. ज्यांना अतिरिक्त अपग्रेड करायचे आहे त्यांच्यासाठी, TecPac पॅकेज उपलब्ध आहे.

स्कूटरचा टॉप स्पीड

बजाज चेतक 2901 मध्ये २.९ kWh चा बॅटरी पॅक आहे, ही मिड सेगमेंट स्कूटर ६३ kmph चा टॉप स्पीड देते. सहा तासांत ते पूर्णपणे चार्ज होते. बाजारात ती TVS iQube 2.2, Ather Rizta S आणि Ola S1 Air सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते. यात मोठे हेडलाइट्स आणि अलॉय व्हील्स आहेत. स्कूटरमध्ये ट्यूबलेस टायर आणि सिंगल पीस सीट आहे.

Bajaj Chetak 2901 या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ९५,९९८ रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या १५ जूनपासून या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj has launched a new range of chetak electric scooters in the market called chetak 2901 pdb