Electric Bike: सध्या जमाना इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. इलेक्ट्रिक कारबरोबरच इलेक्ट्रिक दुचाकीदेखील (Electric Bike) ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणीदेखील वाढते आहे. आता तुम्हालाही जर नवीकोरी इलेक्ट्रिक दुचाकी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे. तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी अगदी स्वस्तात घेता येणार आहे. रिव्हॉल्ट मोटर्स कंपनीने ही खास ऑफर आणली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त २० हजारांच्या डाउन पेमेंटवर १५० किमी रेंज देणारी ‘Revolt RV400’ इलेक्ट्रिक बाइक घरी आणू शकतात. चला तर जाणून घेऊया या बाईक्सवर असलेल्या दुचाकी फायनान्स योजनेबद्दल.
Revolt RV 400 किंमत
Revolt RV 400 ची भारतातील ऑन-रोड किंमत १,३५,५०३ लाख आहे. ही बाईक तुम्हाला २० हजारात खरेदी करता येणार आहे.
(हे ही वाचा : देशातील दुसरी सर्वात स्वस्त कार आता फक्त ४० हजारात होईल तुमची; ‘एवढा’ भरावा लागेल EMI )
Revolt RV 400 फायनान्स प्लॅन
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुमच्याकडे २०,००० रुपये असतील तर बँक या दुचाकीसाठी ११५,५०३ रुपये कर्ज देऊ शकते. बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९ टक्के दराने व्याज आकारेल आणि तुम्हाला ३ वर्षांसाठी ३,६७३ रुपये EMI भरावे लागेल. म्हणजेच ३६ महिन्यांत तुम्हाला १३२,२२८ रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे, तुम्हाला ३ वर्षांमध्ये १६,७२५ रुपये व्याज द्यावे लागेल.
Revolt RV 400 ‘अशी’ आहे खास
Revolt कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक दुचाकी ३.२४ KWh क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते जी ७२ V पॉवर जनरेट करू शकते आणि एका चार्जवर १५० किमीपर्यंत धावू शकते. बाइकचा टॉप स्पीड ८५ किमी प्रतितास आहे. बाईकला इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन राइडिंग मोड मिळतात