Best Selling Bikes October 2023: भारतात वाहन कंपन्या नवरात्रीपासून सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहनांची विक्री करतात. यावेळी ग्राहकांनी आपल्या पसंतीची कार घेण्यासाठी शोरूममध्ये गर्दी केली होती. या हंगामात वाहन कंपन्यांसाठी ३०-३२ दिवस खूप फायदेशीर मानले जातात. त्याच वेळी, कंपन्या सूट आणि ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. दुचाकी कंपन्यांसाठी हा सणासुदीचा काळ चांगलाच गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hero MotoCorp ने सणासुदीच्या काळात विकल्या गेलेल्या वाहनांची माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळात अवघ्या ३२ दिवसांत कंपनीने १४ लाख बाइक्स आणि स्कूटर्सची विक्री केली आहे. सणासुदीच्या काळात कंपनीने विकल्या गेलेल्या वाहनांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. याआधी कंपनीने इतक्या वाहनांची विक्री केली नव्हती.

(हे ही वाचा : Maruti Invicto चा खेळ खल्लास? ६ एअरबॅग्स अन् ८ सीटर Toyota Innova आली नव्या अवतारात, किंमत…)

कंपनीने जुना रेकॉर्ड मोडला

३२ दिवसांचा उत्सवाचा हंगाम नवरात्रीपासून सुरू होतो आणि दिवाळीपर्यंत चालतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने १९ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. यावेळी कंपनीने २०१९ मध्ये बनवलेला स्वतःचा १२.७ लाख दुचाकींचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी, कंपनीने म्हटले होते की, अर्थव्यवस्थेतील सकारात्मकता पाहता देशांतर्गत बाजारपेठेत दुचाकींची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.

‘या’ मॉडेलला मोठी मागणी

हिरोच्या टू-व्हीलर पोर्टफोलिओमध्ये बाईक आणि स्कूटर या दोन्हींचा समावेश आहे, परंतु १००cc विभागातील बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. यामध्ये स्प्लेंडर प्लस ही सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. कंपनी दर महिन्याला २ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करते. ऑक्टोबर २०२३ मध्ये, कंपनीने स्प्लेंडर प्लसच्या ३ लाख ११ हजार ०३१ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये या बाईकची विक्री २ लाख ६१ हजार ७२१ युनिट्स होती.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp the worlds largest manufacturer of motorcycles and scooters sold 574930 units in october 2023 pdb