तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणं गरजेचं झालं आहे. परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत. मारुतीची वॅगन आर कार अनेकांना आवडते. तसेच या कारला चांगले मायलेजदेखील मिळते आणि लहान कुटुंबासाठी हा एक चांगला पर्याय आहे. सध्या या कारची किंमत ६.४५ लाख रुपये आहे. पण हिच कार तुम्हाला २ लाखांमध्ये खरेदी करता येणार आहे.

ही ऑफर CARDEKHO वेबसाइटने दिली आहे, या कारची जाहिरात त्यांच्या साइटवर पोस्ट केली आहे आणि तिची किंमत २ लाख रुपये आहे.

आणखी वाचा : केवळ ३ लाख रूपयांमध्ये घरी न्या सर्वात जास्त Mileage देणारी Hyundai i20 कार

Car Dekho वर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल ऑक्टोबर २०१३ मधलं आहे आणि ती आतापर्यंत १०३,८१८ किमी धावली आहे. या मारुती वॅगनआरची फर्स्ट ओनरशीप आहे आणि ही कार दिल्लीतील DL 4C RTO कार्यालयात नोंदणीकृत आहे.

मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली आणि तुम्हाला ती आवडत नसेल किंवा त्यात काही दोष आढळला तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. कार परत केल्यानंतर, कंपनी तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा तुमच्याकडून कपात न करता तुमचे पूर्ण पेमेंट देईल

आणखी वाचा : फक्त ५९ हजार भरून Tata Tiago घरी घेऊन जा, प्रीमियम फीचर्ससह २३ kmpl ची मायलेज मिळेल

याशिवाय, कंपनी या कारच्या खरेदीवर सहा महिन्यांचा पॅन इंडिया रोड साइड असिस्टन्स प्लॅन देखील देईल, तसेच कंपनीकडून मोफत आरसी ट्रान्सफरची सुविधा देखील दिली जात आहे. ही कार खरेदी करताना या सर्व प्लॅन्स व्यतिरिक्त, कंपनी कर्जाची सुविधा देखील देत आहे ज्यामध्ये कमी बजेट असलेले लोक ही कार सुलभ कर्ज योजनेसह घरी घेऊ शकतात.

तसेच कंपनी ५००० रुपये शिपिंग शुल्क आकारणार नाही आणि ५००० रुपयांचे आरसी ट्रान्सफर देखील कंपनीकडून मोफत दिले जात आहे. याशिवाय कंपनी मोफत थर्ड पार्टी इन्शुरन्सही देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand maruti wagonr in 2 lakh with loan guarantee and warranty plan read full details prp