टॉम आणि जेरी हे काटरून न आवडणारे लोक विरळाच. आजही अनेक मोठी मंडळी लहानग्यांसोबत या दोघांच्या खोडकर वृत्तीचा आनंद घेतात. ही दोन्ही कार्टून पात्रे जसे एकमेकांचे शत्रू तसेच मित्रही! आपण आकाराने लहान आहोत म्हणून आपण दुबळे आहोत, नेहमी नमतंच घ्यावं, याला छेद देणारं जेरीचं वागणं. तर कधी दोघांच्याही   समान शत्रूविरोधात दोघंही एकमेकांचं रक्षण करण्यासाठी उभे ठाकलेले, तर कधी अजिबात भांडाभांडी न करता मिळालेल्या संधीचा लाभ घेणारे..   तर कधी कुठल्याही कठीण प्रसंगात आशा न सोडता दोघांनीही खंबीरपणे तोंड द्यावं..  शत्रुत्वापेक्षाही मैत्री ही एक देणगी आहे याचं यथार्थ दर्शन कधी या दोघांच्या माध्यमातून घडावं..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इथे मात्र टॉम छोटुकल्या जेरीला शोधतोय. का, ते माहीत नाही. पण जेरीला शोधण्यात तुम्हाला टॉमला मदत करायचीय..

जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Color picture