आज आपण ‘शब्द एक पण अर्थ अनेक’ असलेल्या शब्दांचा खेळ खेळणार आहोत. तुम्हाला काही शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. यातील शब्दांना दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्थ आहेत. ते कोणते हे तुम्हाला दिलेल्या अर्थामधून शोधून काढायचे आहेत.
उत्तरे :
अ) भाव – १४) वस्तूचा दर , २०) श्रद्धा
आ) लव – १०) क्षण १५) अंगावरील मऊ केस
इ) लाख – ६) एक पक्का रंग ८) शंभर हजार
ई) शंख – ५) मूर्ख ७) एक प्रकारचे वाद्य
उ) अर्क – ४) लबाड , ९) रस, २४) सूर्य
ऊ) आस – १३) गाडीचा कणा , १८) इच्छा, २१) उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना पृथ्वीच्या मध्यातून सरळपणे जोडणारी काल्पनिक रेषा.
ए) खळ – ३) गोंद, १६) खंड ,२२) नीच
ऐ) घन – २) एका संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या, ११) मेघ, १९) इष्टिकाचित्ती- ज्याची लांबी-रुंदी-उंची एकाच मापाची असते.
ओ) सर – १) पावसाचा जोरदार शिडकावा, १२) ओवलेली माळ , १७) बरोबरी , २३) एक आदरार्थी संबोधन.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
गंमत शब्दांची
आज आपण ‘शब्द एक पण अर्थ अनेक’ असलेल्या शब्दांचा खेळ खेळणार आहोत. तुम्हाला काही शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. यातील शब्दांना दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्थ आहेत. ते कोणते हे तुम्हाला दिलेल्या अर्थामधून शोधून काढायचे आहेत.
First published on: 16-12-2012 at 12:28 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Word joke