उद्योगपती गौतम अदाणी यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आधी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आणि मग कर्ज फेडण्याचा दबाव, त्यानंतर आता ‘द केन’चा अहवाल आलाय. यातून कसे तरी बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतानाच आता बाजार नियामक सेबीने अदाणी समूहाच्या विदेशी व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात माहिती दिली आहे. SEBI आता अदाणी समूहाच्या किमान ३ विदेशी कंपन्यांसोबतच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे. अदाणी समूहाने केलेल्या ‘संबंधित पक्ष व्यवहारां’ (related party transactions)मध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही हेही सेबी तपासणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम अदाणींचे भाऊ विनोद यांच्या कंपन्यांची चौकशी होणार

सेबी ज्या परदेशी कंपन्यांसोबतच्या अदाणी समूहाच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे, त्या उद्योगपती गौतम अदाणी यांचे भाऊ विनोद अदाणी यांच्याशी संबंधित आहेत. अलीकडेच अदाणी समूहाने खुलासा केला होता की, अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडचे अधिग्रहण हे विनोद अदाणी यांच्या कंपन्यांनी केले आहे, म्हणजे त्या कंपन्या त्यांनी विकत घेतल्या आहेत. अदाणी ग्रुपने असेही सांगितले होते की, विनोद अदाणी हे अदाणी ग्रुपच्या प्रमोटर्स ग्रुपचा एक भाग आहेत. विनोद अदाणींच्या या ३ कंपन्यांनी समूहाच्या अनेक असूचीबद्ध (म्हणजे शेअर बाजाराबाहेरील कंपन्या) कंपन्यांसोबत वारंवार गुंतवणुकीचे व्यवहार केले आहेत. हे व्यवहार गेल्या १३ वर्षांत झाले आहेत.

विनोद अदाणी काही कंपन्यांचे मालक किंवा डायरेक्टर

विदेशी कंपन्यांशी झालेल्या व्यवहारांमध्ये नेमका कोणाचा फायदा झाला हे सेबी तपासणार आहे. कारण गौतम अदाणी यांचे भाऊ विनोद अदाणी हे या सर्व कंपन्यांचे लाभार्थी मालक आहेत. विनोद अदाणी हे व्यवहार झालेल्या अदाणी ग्रुपच्या कंपन्यांचे एक तर मालक किंवा डायरेक्टर आहेत. सेबीला या कंपन्यांसोबतच्या ‘रिलेट पार्टी ट्रान्झॅक्शन्स’ची माहिती देण्याच्या बाबतीत नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाले आहे का हे पाहायचे आहे.

‘संबंधित पक्ष व्यवहार’ (related party transactions) म्हणजे काय?

भारतीय कायद्यानुसार, जर एखाद्या सूचीबद्ध कंपनीने स्वतःची उपकंपनी, प्रवर्तक गटातील कंपनी, नातेवाईक इत्यादींसोबत व्यवहार केला तर त्याला संबंधित पक्ष व्यवहार (related party transactions) म्हणतात.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani offshore deals possible sebi probing rule violations vrd