अभिनेता अक्षय कुमार आता नव्या व्यवसायात उतरणार आहे. डायरेक्ट-टू-कंज्यूमर ग्रुप ब्यूटी आणि पर्सनल केअर स्टार्टअप गुड ग्लॅम ग्रुपने पुरुषांसाठी Personal Care & Wellness Products विकण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत संयुक्त उपक्रम राबवला आहे. ही कंपनी या वर्षाच्या मध्यापर्यंत आपली उत्पादन श्रेणी लॉन्च करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अक्षय कुमार आणि गुड ग्लॅम ग्रुप हे दोघेही संयुक्त उपक्रमात गुंतवणूक करतील आणि व्यवसाय वाढवण्यासाठी एकत्र काम करतील आणि लवकरच पुरुषांसाठी Personal Care & Wellness Products लॉन्च करतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय कुमार सांगतो की, मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि ब्रँड डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होणार आहे. मी आयुष्यभर फिटनेसवर विश्वास ठेवला आहे आणि हाच अनुभव मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठीच ही Personal Care & Wellness Products बाजारात आणणार आहे. या उत्पादन लाइनची उपकंपनी गुड ग्लॅम ग्रुपच्या गुड ब्रँड्स व्हर्टिकल अंतर्गत येईल, ज्याचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी सुखलीन अनेजा आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुड ग्लॅम ग्रुप जो महिलांसाठी सौंदर्य प्रसाधन उत्पादनांच्या श्रेणीशी संबंधित आहे, आता पुरुषांच्या श्रेणीमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ दर्पण सांघवी म्हणाले की, कंपनी गेल्या दोन वर्षांपासून या क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. २०२१ मध्ये डिजिटल मीडिया कंपनी ScoopWhoop ब्रँडचे संपादन पुरुषांच्या Personal Care & Wellness Products च्या श्रेणीला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

कंपनी ‘या’ ब्रँडशी चर्चा करीत आहे

सांघवी म्हणाले की, कंपनीने गेल्या वर्षी दुसरा ब्रँड खरेदी करून या विभागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दोन्ही पक्ष मूल्यांकनावर सहमत होऊ न शकल्याने हा करार रद्द झाला. पार्क अव्हेन्यू आणि कामसूत्र ब्रँड्स असलेल्या रेमंड ग्रुपच्या ग्राहक सेवा व्यवसायाशी कंपनीची चर्चा सुरू आहे. हा ब्रँड घेण्यासाठी ग्रुमिंग कंपनी Ustraa शीही बोलणी करीत आहे. सांघवी यांनी उत्पादन तपशील किंवा ब्रँडचे नाव शेअर करण्यास नकार दिला. नवीन संयुक्त उपक्रमात गेलेल्या गुंतवणुकीचा खुलासाही त्यांनी केला नाही.

१०० कोटींची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले

कंपनीने पहिल्या वर्षी १०० कोटी रुपयांच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे आणि तीन वर्षांत महसूल ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. भविष्यात कंपनीचा पुरुषांच्या श्रेणीतील जवळपास निम्म्या ब्रँडचा वाटा असण्याची शक्यता आहे. एकूण व्यवसायात पुरुष वर्गाचा वाटा १८-२०% असण्याची शक्यता आहे. सेलिब्रेटीसोबत भागीदारी हा ब्रँड पुढे नेण्याचा सर्वोत्तम मार्ग होता, विशेषत: डिझायनर मनीष मल्होत्रासोबतच्या पहिल्या सेलिब्रिटी ब्रँड भागीदारीमुळे कंपनीला मिळालेले यश लक्षात घेता येण्यासारखे आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar entry into a new business invest with good glamm group company vrd