एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, डिसेंबर २०२३ मध्ये ९२.८७ दशलक्ष टन (MT) पर्यंत इतके उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या ८३.८६ MT या आकडेवारीला मागे टाकत १०.७५ टक्क्यांची वाढ दर्शवत आहे, असे कोळसा मंत्रालयाने जाहीर केले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कोल इंडिया लिमिटेडचे (CIL) उत्पादन ८.२७ टक्क्यांच्या वाढीसह ७१.८६ MT इतके झाले आहे, जे डिसेंबर २०२२ मध्ये ६६.३७ MT इतके झाले होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षाअखेरीस संचयी कोळसा उत्पादनात (डिसेंबर २०२३ पर्यंत)१२.४७ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, ६८४.३१ मेट्रिक टन इतके उत्पादन झाले आहे, जे गतवर्षीच्या (आर्थिक वर्ष २०२२-२३) याच कालावधीत ६०८.३४ एमटीपर्यंत झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार; ३ दिवसांत ‘एवढ्या’ कोटींचे नुकसान होण्याची शक्यता

डिसेंबर २०२३ मध्ये कोळशाच्या प्रेषणात गतवर्षीच्या तुलनेत ८.३६ टक्के इतकी वाढ झाली असून, ते ८६.२३ MT पर्यंत पोहोचले, डिसेंबर २०२२ मध्ये नोंदवलेल्या ७९.५८ MT च्या तुलनेत उल्लेखनीय प्रगती झाल्याचे ही वाढ दर्शविते.डिसेंबर २०२३ मध्ये ५.४९ टक्क्यांची वाढ दर्शवत ६६.१० MT इतके कोल इंडिया लिमिटेडचे प्रेषण (CIL) झाले, जे डिसेंबर २०२२ मध्ये ६२.६६ MT इतके होते.संचयी कोळशाच्या प्रेषणात आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ६३७.४० MT च्या तुलनेत आर्थिक २०२३-२४ मध्ये ११.३६ टक्के इतकी लक्षणीय वाढ यात झाली असून, (डिसेंबर २०२३ पर्यंत) ते ७०९.८० MT इतके झाले आहे.

हेही वाचाः नवीन वर्षात स्विगीद्वारे बिर्याणीची रेकॉर्ड ब्रेक विक्री, ऑर्डर देण्यात ‘हे’ शहर राहिले आघाडीवर

कोळसा क्षेत्रामध्ये अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे, ज्यामध्ये उत्पादन, प्रेषण आणि साठा याची पातळी उल्लेखनीय उंचीवर गेली आहे. या वाढीचे श्रेय कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांना (PSUs) असून त्यांनी ही प्रगती साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे उपक्रम कोळसा पुरवठा साखळीची बांधिलकी अधोरेखित करत, देशभरात कोळशाचे अखंड वितरण सुनिश्चित करतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal production reached 92 87 million tonnes in december 2023 registering a growth of 1075 percent vrd