Gold rate today: दोन दिवसांत सोन्याच्या दरात जवळपास १००० रुपयांनी घट झाली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४८० रुपयांनी घसरला. या घसरणीनंतर सोन्याचा भाव ५८,७७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मंगळवारी ते प्रति दहा ग्रॅम ४७० रुपयांनी स्वस्त झाले होते. आज आणि काल मिळून १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९५० रुपयांनी घट झाली. सोमवारी म्हणजेच २० मार्च रोजी दिल्लीत सोन्याचा भाव ६०,१०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता. सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही सुमारे ३५० रुपयांची घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांदी आज ३४५ रुपयांनी स्वस्त

आज चांदीच्या दरात किलोमागे ३४५ रुपयांची घट झाली आहे. या घसरणीनंतर दिल्ली सराफा बाजाराचा भाव ६८८५० रुपये प्रति किलो झाला, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. परदेशी बाजारात सोने-चांदीत मोठी घसरण झाली आहे. सोने १९४० डॉलर प्रति औंस आणि चांदी २२.३४ डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.

फेडरलच्या निर्णयाचा परिणाम होणार

गेल्या दोन व्यापार सत्रांमध्ये कॉमेक्सवर सोने ३ टक्क्यांहून अधिक घसरले. सोमवारी कॉमेक्स सोन्याने प्रति औंस २०१० डॉलरची पातळी गाठली होती. त्यापेक्षा ते ७० डॉलरने स्वस्त झाले आहे. आज रात्री उशिरा फेडरल रिझर्व्हकडून चलनविषयक धोरण जाहीर केले जाणार आहे. या निर्णयाचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होणार आहे.

अनिश्चिततेच्या वातावरणात सोने मजबूत

वर्ष २०२३ मध्ये सोन्याने सर्वाधिक ८ टक्के परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यास त्यात सुधारणा होईल. व्याजदर स्थिर राहिल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, अनिश्चिततेच्या वातावरणात सोने मजबूत झाले आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या

विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवे दर पाहू शकता. तसेच उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतात बदलतात.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

फेब्रुवारीमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढली

महत्त्वाचे म्हणजे चीन आणि मध्य पूर्व बाजारपेठांमधील मागणीत सुधारणा झाल्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढून २८८३२.८६ कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात २३,३२६.८० कोटी रुपये होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांची (CPD) एकूण निर्यात ३२ टक्क्यांनी वाढून १९,५८२.३८ कोटी रुपये झाली. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा १४,८४१.९० कोटी रुपये होता.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate today gold is cheaper by rs 950 in two days know the price of 10 gram gold 22 march 2023 vrd