Premium

“सबसिडीसह देशात कुठलीच गोष्ट मोफत दिली जाऊ नये”, नारायण मूर्तींचं वक्तव्य; म्हणाले, “मीसुद्धा गरीब…”

नारायण मूर्ती म्हणाले, भारतासारख्या गरीब देशाला समृद्ध करण्यासाठी तळागाळातल्या लोकांना सक्षम करणारी भांडवलशाही हा एकमेव पर्याय आहे.

narayana murthy
नारायण मूर्ती बंगळुरू येथे आयोजित टेक समिट २०२३ मध्ये बोलत होते.

आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असं वक्तव्य इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केलं होतं. त्यांच्या मते भारतात काम करणाऱ्यांची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. ती वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करायला हवं. मूर्ती यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. दरम्यान, नारायण मूर्ती यांनी आता असंच आणखी एक वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायण मूर्ती म्हणाले, “देशात कुठलीच गोष्ट मोफत दिली जाऊ नये”. बंगळुरू येथे आयोजित टेक समिट २०२३ मध्ये ते बोलत होते. मूर्ती म्हणाले, मी कोणत्याही मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही. परंतु, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सबसिडीचा लाभ घेणाऱ्या लोकांनी समाजाच्या भल्यासाठी योगदान देणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेता, सबसिडी मिळवता, तर त्या बदल्यात तुम्ही काहीतरी द्यायला हवं. भारतासारख्या गरीब देशाला समृद्ध करण्यासाठी तळागाळातल्या लोकांना सक्षम करणारी भांडवलशाही हा एकमेव पर्याय आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nothing should be given for free says narayana murthy on subsidy asc

First published on: 30-11-2023 at 19:31 IST
Next Story
टाटा टेक्नॉलॉजीजचे अभूतपूर्व पदार्पण; १४० टक्के अधिमूल्यासह सूचिबद्ध