पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडांची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

या फंडाच्या पोर्टफोलिओचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोर्टफोलिओ टर्नओव्हर अवघा ४४ % आहे मिडकॅप फंडातील अन्य फंडांमध्ये हेच प्रमाण वार्षिक २०० % आहे. म्हणजेच या फंडाचे फंड मॅनेजर पोर्टफोलिओ मध्ये सतत बदल करणे या ऐवजी चांगले शेअर्स विकत घेऊन एक दीड वर्षापर्यंत पोर्टफोलिओ मध्ये ठेवणे हा पर्याय पसंत करतात.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

२७ जानेवारी २०२५ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· दोन वर्षे – २४.७९ %

· तीन वर्षे – १३.७४ %

· पाच वर्षे – १६.५० %

· दहा वर्षे – १३.६७ %

· फंड सुरु झाल्यापासून – १५.१८ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

या फंडाच्या उपलब्ध पोर्टफोलिओनुसार ४४ % गुंतवणूक मिडकॅप २२ % स्मॉल कॅप आणि जवळपास ८ % गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारच्या कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे.

३१ डिसेंबर २०२४ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार पोर्टफोलिओ मध्ये एकूण ५७ शेअर्सचा समावेश करण्यात आला असून आघाडीची ३१ टक्के गुंतवणूक दहा शेअर्स मध्ये केली गेली आहे.

कोफोर्ज ४.९२ % , इप्का ४.०७ % , कोरोमंडल इंटरनॅशनल ३.२१% , भारत फोर्ज २.९९%, सुप्रीम इंडस्ट्रीज २.८३%, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन २.६९%, फिनिक्स मिल्स २.५९% , जे के सिमेंट २.५८% , ए यु स्मॉल फायनान्स बँक २.५७%, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस २.५७% हे आघाडीचे दहा शेअर्स आहेत.

अलीकडेच विशाल मेगा मार्ट आणि सिप्ला हे दोन शेअर पोर्टफोलिओ मध्ये दाखल झाले असून सीजी पावर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स व इन्फो एज इंडिया या शेअर्समधून फंडाने आपली गुंतवणूक विकली आहे.

पोर्टफोलिओतील ८% गुंतवणूक फार्मासिटिकल क्षेत्रात ७.५ % कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, विशेष केमिकल्स ४.८६ % वाहन निर्मिती संबंधित उद्योगात ४.७४ % खत निर्मिती ३.२१ % अशी गुंतवणूक केली आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· दोन वर्षे १६.३९ %

· तीन वर्षे १७.६१ %

· पाच वर्षे १७.६ %

· सलग दहा वर्ष १५.२५ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

संक्षेपात

· फंड घराणे – डीएसपी म्युच्युअल फंड

· फंडाचा प्रकार – मिड कॅप इक्विटी फंड

· एन. ए. व्ही. (३१ डिसेंबर २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – १३१ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ डिसेंबर २०२४ रोजी ) – १९२९६ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर – विशाल सांबरे , अभिषेक घोष .

फंडाची स्थिरता ( ३१ डिसेंबर २०२४ )

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १४.१९

· बीटा रेशो ०.८४

· शार्प रेश्यो ०.६९

  • एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dsp mutual fund performance over the years described by kaustubh joshi psp