इतिहासात पेशव्यांच्या पराक्रमाच्या कथेत, पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले असे वाचनात येते. (पाकिस्तानात असलेल्या अटक किल्ल्यापर्यंत मराठ्यांचे साम्राज्य होते) या इतिहासाची पुनरावृत्ती सरलेल्या सप्ताहातील गुरुवारच्या रात्री झाली. आपल्या पराक्रमी सैन्यांनी पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरे, ज्यात इस्लामाबाद, कराची, लाहोर, पंजाब, सिंध, अटक या शहरांवर दहशतवादाविरोधातील अटकेपार अचूक प्रतिहल्ला करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर दिले. यामुळे युद्धाची ठिणगी पडण्याची आशंका असल्याने, निफ्टी निर्देशांकावर घातक चढ-उतार हे ही अपेक्षितच होते. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांची देखील आर्थिक, मानसिक तयारी हवी. म्हणूनच निफ्टी निर्देशांकावर २४,०००चा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ विकसित केलेला. उल्लेखनीय म्हणजे तो चालू असलेल्या संघर्षातही राखला गेला आहे. आताचा युद्धज्वर आणि युद्धकालीन भविष्यात, निफ्टी निर्देशांक २४,००० च्या स्तरावर सतत पाच दिवस टिकल्यास, या निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,३००, २४,६००, २४,९०० ते २५,५०० अशा तेजीच्या तोफा सुटतील. विपरित काही घडले आणि निफ्टी निर्देशांकाने २४,०००चा स्तर तोडल्यास, त्याचे खालचे लक्ष्य २३,८००, २३,५००, २३,२०० ते २२,५०० असे असेल.
निकालपूर्व विश्लेषण
१) एसआरएफ लिमिटेड
९ मेचा बंद भाव : ३,००४.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, १२ मे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २,९०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून २,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,१०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,२५० रुपये. निराशादायक निकाल असल्यास : २,९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, २,६५० रुपयांपर्यंत घसरण २) टाटा स्टील लिमिटेड
९ मेचा बंद भाव : १४२.७८ रु.
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, १२ मे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १४० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १५५ रुपये, द्वितीय लक्ष्य १७५ रुपये. निराशादायक निकाल असल्यास: १४० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तर तोडत, १३० रुपयांपर्यंत घसरण ३) भारती एअरटेल लिमिटेड
९ मेचा बंद भाव : १,८४८.४० रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, १३ मे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,७२५ रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : समभागाकडून १,७२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९३० रुपये, द्वितीय लक्ष्य २,००० रुपये. निराशादायक निकाल असल्यास: १,७२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६२५ रुपयांपर्यंत घसरण ४) सिप्ला लिमिटेड
९ मेचा बंद भाव : १,४८० रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, १३ मे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,४७० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : समभागाकडून १,४७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५७० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६२०रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: १,४७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, १,४३५ रुपयांपर्यंत घसरण ५) हिरो मोटोकॉर्प लिमिटेड
९ मेचा बंद भाव : ३,८५३.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, १३ मे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३,७२० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: समभागाकडून ३,७२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,२०० रुपये. निराशादायक निकाल असल्यास: ३,७२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, ३,५५०रुपयांपर्यंत घसरण
६) टाटा मोटर्स लिमिटेड
९ मेचा बंद भाव: ७०८.५० रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, १३ मे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ६९० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: समभागाकडून ६९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७३० रुपये, द्वितीय लक्ष्य ८३० रुपये. निराशादायक निकाल असल्यास: ६९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, ६३० रुपयांपर्यंत घसरण
आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2025 रोजी प्रकाशित
येत्या दिवसांत ‘निफ्टी’च्याही तेजीच्या तोफा सुटतील?
इतिहासात पेशव्यांच्या पराक्रमाच्या कथेत, पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले असे वाचनात येते. (पाकिस्तानात असलेल्या अटक किल्ल्यापर्यंत मराठ्यांचे साम्राज्य होते) या इतिहासाची पुनरावृत्ती सरलेल्या सप्ताहातील गुरुवारच्या रात्री झाली.
Written by आशीष अरिवद ठाकूर

First published on: 12-05-2025 at 01:05 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSनिफ्टीNiftyमराठी बातम्याMarathi Newsलोकसत्ता प्रीमियमPremium LoksattaशेअरShareशेअर बाजारShare Market
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fluctuations in the nifty index print eco news amy