Premium

Money Mantra : आधारपासून ते डीमॅटपर्यंत अन् बँक लॉकरपासून ते एफडीपर्यंत ही सर्व कामे डिसेंबरमध्ये पूर्ण कराच अन्यथा…

म्युच्युअल फंड नॉमिनीची अंतिम मुदत, SBI अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख, बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे.

important days in december 2023
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

31st December 2023 : जसजसे वर्ष २०२३ संपत आहे, तसतसे पैशाशी संबंधित कामे मार्गी लावण्याची वेळही कमी होत चालली आहे. डिसेंबर हा कॅलेंडर वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि अनेक आर्थिक मुदती असलेला महिनादेखील असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 31 डिसेंबरची अंतिम मुदतीपूर्वी पैशाशी संबंधित अनेक कामे आहेत, जी या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावी लागतील. यामध्ये म्युच्युअल फंड नॉमिनीची अंतिम मुदत, SBI अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख, बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः Money Mantra : स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप अन् मल्टी कॅप फंडांमध्ये फरक काय?

आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ तुम्ही तुमचे आधार कार्ड पत्ता, फोन नंबर आणि ईमेलसह अपडेट करू शकता. ३१ डिसेंबर २०२३ नंतर तुम्हाला आधार अपडेटसाठी शुल्क भरावे लागेल.

हेही वाचाः बिहारमधून मुंबईत आले, अनेक धक्के खाल्ले आणि आज ४५ हजार कोटींच्या कंपनीचे मालक, कोण आहेत बासुदेव सिंग?

बँक लॉकर करार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना त्यांच्या ग्राहकांबरोबर सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. पहिल्या टप्प्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे. नवीन लॉकर करारांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जातील, जसे की उच्च भरपाई मर्यादांशी संबंधित नियम इत्यादी आहेत.

डिमॅट खात्यासाठी नॉमिनी

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डिमॅट खात्यांसाठी नॉमिनी फॉर्म सबमिट करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत डिमॅट खात्याचे नामांकन दाखल करणे आवश्यक आहे.

विशेष एफडी

SBI, इंडियन बँक, IDBI बँक त्यांच्या काही विशेष FD चालवत आहेत, ज्यांची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे. यामध्ये SBI ची अमृत कलश योजना, इंडियन बँकेची “Ind Super 400” आणि “Ind Supreme 300 Days” मुदत ठेवी इत्यादींचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: From aadhaar to demat and from bank locker to fd complete all these tasks in december vrd

First published on: 07-12-2023 at 12:59 IST
Next Story
Money Mantra : स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप अन् मल्टी कॅप फंडांमध्ये फरक काय?