• ऋषी पिपारैया

Mutual Fund SIP: चांगली बचत करण्यासाठी बरेच लोक म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात. ज्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो. बऱ्याचदा तुम्ही विचारपूर्वक पद्धतीनेच कुठेही गुंतवणूक करता. परंतु तुम्हालाही गुंतवणूक करून चांगले उत्पन्न मिळवायचे असल्यास तुम्हाला पोर्टफोलिओच्या जोखमीचे वैविध्य समजून घ्यावे लागेल. ही ऑक्टोबर २००४ ची गोष्ट आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये शांतपणे काम करत होतो. तेव्हाच माझा एक सहकारी जो गुंतवणूक तज्ज्ञ होता, माझ्याशी बोलायला आला. पुढच्या १५ मिनिटांत त्यांनी मला नवीन सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP बद्दल सांगितले. मला त्यांचा मुद्दा समजला आणि मी ३००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह योजनेला सुरुवात केली. तेव्हापासून जवळपास २० वर्षे उलटून गेलीत आणि या काळात मला बाजाराने सरासरी १३ टक्के परतावा दिला आहे. त्यावेळी काही हजार रुपयांची गुंतवणूक आज लाखात झालीय. जर तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल, तर इक्विटी म्युच्युअल फंडातील एसआयपी तुमच्यासाठी अधिक चांगली असू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः मोठी बातमी! देशातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची विक्री, ‘इतक्या’ कोटींना झाला व्यवहार

इक्विटी म्युच्युअल फंड

ज्यांच्याकडे शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ किंवा कौशल्य नाही, त्यांच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमचे पैसे ब्रोकरला देता आणि तो बाजार, परतावा आणि जोखीम यावर आधारावर तुमच्यासाठी स्टॉक निवडतो. विशेष म्हणजे असे फंडदेखील आहेत, त्यात तुम्ही ब्रोकरच्या माध्यमातून पैसे गुंतवून सर्व निधी एकत्र करू शकता आणि तुमच्या वतीने ब्रोकर बाजारात गुंतवणूक करू शकतो. यामध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक तुम्हाला पाहिजे तेव्हा काढू शकता. ही एक अतिशय पारदर्शक प्रक्रिया आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ कसा चालला आहे हे तुम्हाला नेहमीच माहीत होत राहणार आहे.

हेही वाचाः रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला १५,५०० कोटी हस्तांतरित; JFSL सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार

पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP)

तुमच्याकडे एकरकमी रक्कम असेल, तेव्हाच गुंतवणूक करावी, असा सामान्य समज आहे. खरं तर एक बाब अशीदेखील आहे की, आपण कधीही बाजाराला वेळ देऊ शकत नाही. तुम्हाला वाटेल की, आता बाजार खाली जाईल, मग बाजार वर येईल आणि नफा कमावण्याची उत्तम संधी तुमच्या हातून निसटून जाईल. पण SIP ही समस्या सोडवते. SIP मध्ये तुम्हाला दर महिन्याला न थांबता ठराविक रक्कम भरावी लागली तरी त्यावर चांगला परतावा मिळतो. बाजार वर-खाली किंवा सपाट असो त्याचा काहीही फरक पडत नाही. दीर्घ मुदतीत तुमचा पोर्टफोलिओ मजबूत होण्याची शक्यता जास्त आहे. विविध फंड हाऊसमधून शेकडो इक्विटी म्युच्युअल फंड पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात थेट अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) किंवा तुमच्या बँक किंवा आर्थिक सल्लागाराद्वारे SIP सुरू करू शकता. कोणीही दरमहा काही १०० रुपयांत एसआयपी सुरू करू शकतो.

(ऋषी पिपारैया यांचा लेख, बेस्ट सेलिंग लेखक आणि आर्थिक मार्गदर्शक)

(तळटीप – हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. वाचकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra chances of your luck shining in mutual fund sip invest like this and get strong profit vrd