who is 31-year-old Aravind Srinivas india’s youngest billionaire? : चेन्नईत जन्मलेले ३१ वर्षीय एआय क्षेत्रातील उद्योजक अरविंद श्रीनिवास यांनी देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून M3M ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५’ मध्ये स्थान मिळवले आहे. या तरुण उद्योजकाची संपत्ती ही अंदाजे २१,१९० कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. नेमकं हा तरूण करतो काय? याचे शिक्षण काय झाले आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहेत अरविंद श्रीनिवास?

अरविंद श्रीनिवास हे ‘परप्लेक्सिटी’ (Perplexity) या एआय स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ आहेत. गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान जगात विशेषतः जनरेटिव्ह एआय (Generative AI) च्या क्षेत्रात त्यांचे नाव विशेष चर्चेत आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे ७ जून १९९४ रोजी जन्मलेल्या श्रीनिवास यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेत असताना, श्रीनिवास यांनी ‘रिइन्फोर्समेंट लर्निंग’ आणि ‘अॅडव्हान्स्ड रिइन्फोर्समेंट लर्निंग’ हे विषय देखील शिकवत होते.

श्रीनिवास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये २०२१ मध्ये पीएचडी (PhD) पूर्ण केली. त्यांची रिसर्च ही ‘कॉन्ट्रास्टिव्ह लर्निंग फॉर कॉम्प्युटर व्हिजन’, रिइन्फोर्समेंट लर्निंग, तसेच इमेज जनरेशन, इमेज ओळख रेकगनिशन आणि व्हिडिओ जनरेशन यााठी वापरल्या जाणारे ट्रान्सफॉर्मर-आधारित मॉडेल्स या विषयांवर केंद्रीत होते. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, २०२० आणि २०२१ च्या स्पिंग सेमिस्टरमध्ये त्यांनी ‘डीप अनसुपरवाइज्ड लर्निंग’ हा विषय देखील शिकवला.

करिअर कसे राहिले आहे?

श्रीनिवास यांनी कामाचा अनुभव हा जगातील प्रमुख टेक कंपन्यांमध्ये घेतला. त्यांनी ओपनएआय या कंपनीमध्ये रिइन्फोर्समेंट लर्निंगवर काम केले आणि नंतर लंडन येथील डीपमाईंड कंपनीत रुजू झाले, येथए त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंगवर लक्ष केंद्रीत केले. यानंतर काही काळ त्यांनी गुगलमध्ये काम केले. जेथे त्यांनी हॅलोनेट (HaloNet) आणि रेझनेट-आरएस (ResNet-RS) सारखे व्हिजन मॉडेल्स विकसित करण्यावर काम केले. त्यानंतर ते पुन्हा रिसर्च सायंटिस्ट ओपनएआयमध्ये परतले.

श्रीनिवास यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये डेनिस यारट्स (Denis Yarats) आणि अँडी कॉन्व्हिन्स्की (Andy Konwinski) यांच्याबरोबर मिळून ‘परप्लेक्सिटी एआय’ (Perplexity AI) ची स्थापना केली. या कंपनीचे एआय-पॉवर्ड चॅट-बेस्ड सर्च इंजिन GPT-3 सारख्या मॉडेल्सचा वापर करून वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देते.

जानेवारी २०२३ पासून श्रीनिवास अनेक एआय स्टार्टअप्सध्ये एंजल इन्व्हेस्टर राहिले आहेत, ज्यामध्ये इलेव्हनलॅब्स (ElevenLabs), आणि सुनो (Suno) यांचा समावेश आहे.