ऑगस्ट महिन्यात दिल्लीस्थित एमिटी विधि महाविद्यालयातील सुशांत रोहिला या विद्यार्थ्यांने परीक्षेत अपयश आल्याच्या कारणाने आत्महत्या केली. ‘मी मानसिकदृष्टय़ा दुर्बल झालो आहे आणि परीक्षेत अपयश आले तर मी आत्महत्या करीन,’ अशा आशयाचे पत्र आपल्या प्राध्यापकांना पाठविले होते. मात्र प्राध्यापकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या तणावात त्याने आत्महत्या केली. भारतात परीक्षांच्या निकालानंतर ताणामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. परीक्षेत नापास झालो तर आपले आयुष्य उद्ध्वस्त होईल, मी स्पर्धेत मागे राहील अशा अनेक विचारांमुळे परीक्षेच्या दिवसांत मुलांना धड दोन वेळेचे जेवणही जात नाही. परीक्षेबाबत मनात इतकी भीती असते मात्र ती व्यक्त व्हायला महाविद्यालयात कोणी ऐकून घेणारे नसते आणि कुटुंबीयांना सांगणे शक्य होत नाही. अशा वेळी मनाची अस्वस्थता व्यक्त करायला संधीच नसते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील किंवा विचारातील नेमकी अडचण शिक्षकांपर्यंत पोहोचत नाही. काही महाविद्यालयातील शिक्षक आवर्जून विद्यार्थ्यांशी चर्चा करतात, त्यांचे प्रश्न समजावून घेतात. दिल्लीतील घटनेनंतर पुन्हा एकदा महाविद्यालयात समुपदेशक केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण मानसिक आरोग्य चांगले असेल तर मुले अभ्यास आणि करिअरच्या स्पर्धेत तग धरून राहू शकतात.
– प्रा. नीता ताटके, डी. जी. रुपारेल महाविद्यालय, मानसशास्त्र विभाग
– शामिम मोदी, टाटा सामाजिक संशोधन केंद्र
– डॉ. उमेश भरते, मानसशास्त्र विभाग (मुंबई विद्यापीठ)
