वित्तीय क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ म्हणजेच बीएसई इन्स्टिटय़ूट, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या वित्तीय सेवा व गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील खाली नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत –
ग्लोबल फायनान्शियल मार्केटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम : दोन वर्षे कालावधीच्या व मुंबई, दिल्ली व अहमदाबाद येथे उपलब्ध असणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय क्षेत्रातील प्रशिक्षित व अनुभवींना वित्तीय व्यवहार व जागतिक आर्थिक व्यवहार इ.चा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
बँकिंग व फायनान्स विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम : एक वर्ष कालावधीच्या आणि मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता व चेन्नई येथे उपलब्ध असणाऱ्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमात वेगाने विकसित होण्याचा बँकिंग व वित्तीय सेवा आर्थिक क्षेत्राचा विस्तारासह परिचय करून देण्यात येणार आहे.
गुंतवणूक व्यवस्थापनविषयक विशेष अभ्यासक्रम : एक वर्ष कालावधीच्या व दूरस्थ शिक्षण पद्धतीअंतर्गत टपालाद्वारा उपलब्ध असणाऱ्या या विशेष अभ्यासक्रमात गुंतवणूक व्यवस्थापन व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यास व कौशल्याचा समावेश करण्यात येणार आहे.
अधिक माहिती व तपशील : वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती
व तपशिलासाठी बीएससी इन्स्टिटय़ूट लिमिटेडच्या नि:शुल्क दूरध्वनी
क्र. १८००२२९०३० वर अथवा इन्स्टिटय़ूटच्या admission@bseindia.com ई-मेलवर संपर्क साधावा अथवा http://www.bsebti.comया संकेतस्थळाला भेट द्यावी.
० अर्ज पाठविण्याचा पत्ता : संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि., १८ वा व १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१ या पत्त्यावर पाठवावेत.
बँकिंग, वित्तीय सेवा व गुंतवणूक व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण-अभ्यासक्रमासह करिअर करण्यासाठी या अभ्यासक्रमांचा विचार करता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘अर्थ’पूर्ण करिअर
वित्तीय क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ म्हणजेच बीएसई इन्स्टिटय़ूट, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या वित्तीय सेवा व गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील खाली नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत -

First published on: 25-03-2013 at 12:25 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance full career