वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती, मुंबई येथे वास्तुआरेखकांच्या ४ जागा : उमेदवार वास्तुशास्त्र विद्यालयातील पदवीधर असावेत व त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर-नवी दिल्ली या संस्थेचे सभासदत्व घेतलेले असावे. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती-मुंबईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि २० x १० सेंटीमीटर्स आकाराचे स्वत:चे नाव आणि पत्ता लिहिलेले व पुरेशा टपाल तिकिटांसह असणारे अर्ज तपासणी अधिकारी तथा सदस्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१२.
‘बेस्ट’मध्ये वाहकांच्या १०६० जागा : अर्जदारांनी मराठीसह शालांत परीक्षा कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘बेस्ट’ उपक्रमाची जाहिरात पाहावी.संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज उप-मुख्य कर्मचारीय व्यवस्थापक, मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१२.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चार्टर्ड अकाउंटन्टच्या ४० जागा : अर्जदारांनी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सीची सीए पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतरची उमेदवारीपण पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. अथवा एचपीच्या http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१२.
मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजरच्या ४० जागा : अर्जदार एमबीए असावेत व त्यांना प्रशासकीय कामाचा पाच वर्षांचा अनुभव व संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ४० वर्षे.अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात पाहावी अथवा उच्च न्यायालयाच्या http://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१२.
स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅपरेंटिस एक्झामिनेशन – २०१३ : उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र यांपैकी एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २१ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या  १३ ते १९ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी, अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१२.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity