बँकिंग आणि फायनान्समधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
कें द्र सरकार आणि रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणेतर्फे घेण्यात येणाऱ्या बँकिंग आणि फायनान्स विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रमाचा कालावधी व तपशील :
बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रात व्यवस्थापनपर जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुरक ठरणाऱ्या या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे असून सध्या अभ्यासक्रमाच्या २०१३-२०१५ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देण्यात येत आहे.
आवश्यक पात्रता :
अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. जे विद्यार्थी यंदा त्यांच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. मात्र त्यांच्या पदवी परीक्षेचा निकाल जून २०१३ पर्यंत लागायला हवा.
याशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची ‘कॅट’ म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असायला हवी. ‘कॅट’ पात्रता प्रवेश परीक्षेची नोंदणी ३० जुलै ते १९ सप्टेंबर २०१२ च्यादरम्यान होणार असून, त्यानुरूप उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया :
वर नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांना फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या बँकिंग आणि फायनान्स विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील :
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एनआयबीएमच्या ६६६.ल्ल्र्रुेल्ल्िरं.१ॠ या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा दूरध्वनी क्र. ०२०-२६७१६००० वर संपर्क साधावा.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच मिळण्यासाठी १२५० रु.चा ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट’च्या नावे असणारा व पुणे येथे देय असणारा डिमांडड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डीन-एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट, एनआयबीएम-पोस्ट ऑफिस, कोंढवा, पुणे ४११०४८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१२.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना बँकिंग आणि वित्तीय सेवा या क्षेत्रात विशेष पदविका अभ्यासक्रमासह अधिकारी पदावर आपले करिअर सुरू करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘अर्थ’पूर्ण करिअर
बँकिंग आणि फायनान्समधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम कें द्र सरकार आणि रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट,

First published on: 10-12-2012 at 01:39 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meaningful careers