– भूषण केळकर, मधुरा केळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिला भाग म्हणजे समाज माध्यमांमध्ये आपला ‘ऑनलाइन प्रेझेन्स’ कसा असला पाहिजे, आपण आपल्याला स्वत:ला कसं मांडतो आणि आपलं अस्तित्व कसं निर्माण करतो यावर अनेक संधींची उपलब्धता अवलंबून असेल. दुसरा म्हणजे अॅप्टिट्यूड टेस्टची तयारी कशी करायची आणि तिसरा म्हणजे की उत्तम रेज्युमे कसा लिहायचा – कोणत्या गोष्टी अंतर्भूत करायच्या आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे कोणत्या टाळायच्या !

ऑनलाइन प्रेझेन्स

ऑनलाइन प्रेझेन्स किंवा समाज माध्यमांमध्ये आपण स्वत:ला कसं मांडतो याच्याबद्दल महत्त्वाचे दोन उपयोग सांगतो. अनेकदा असं दिसून आलेलं आहे की अनेक कंपन्या या समाजमाध्यमावरनं रिक्रुटमेंट करत आहेत आणि त्यामुळे आपण समाजमाध्यमावर आपली ओळख नीट केलेली करून दिलेली असणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला इंटर्नशिप किंवा नोकरीची संधी मिळू शकते. दुसरे म्हणजे तुम्ही जे काही समाजमाध्यमांमध्ये लिहिता त्याचा वापर तुमची पार्श्वभूमी तपासण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे निष्कर्ष असा की समाजमाध्यमांवर आपण असलं पाहिजे आणि ते अद्यायावत असलं पाहिजे.

अॅप्टिट्यूड टेस्ट

अॅप्टिट्यूड टेस्टची तयारी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही वेबसाइट वर जाऊन सराव करणे आणि करत राहणे चांगले राहील. Indiabix. com, Geeksforgeeks, Freshersworld अशा अनेक! वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न/ कोडी/ कूट यांचा सराव करणे चांगले राहील.

वैयक्तिक माहिती

वैयक्तिक माहिती (रेज्युमे) साठी तीन नियम सांगेन : पहिला म्हणजे आपल्याला स्वची ओळख असली पाहिजे – त्याच्यामध्ये आपली बलस्थाने आणि कमतरता, आपला कार्यानुभव, शिक्षण, स्वत:ची आवडनिवड नीट ओळखून ती मांडता आली पाहिजे. दुसरा नियम म्हणजे तुमच्या रेज्युमेचा श्रोता किंवा वाचक कोण आहे हे नेमकं कळून त्यानुसार आपण माहिती मांडणे आणि तिसरा नियम म्हणजे मांडणीची समर्पकता – ज्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करता आहात त्याच्यामधले महत्त्वाचे शब्द – कीवर्ड्स हे तुमच्या रेज्युमेमध्ये जुळत आहेत का, तुमचे कौशल्य आणि शिक्षण आणि नोकरीमधील अपेक्षा याच्यातली साधर्म्य असणं.

रेज्युमेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी बहुतांशी लोकांना माहिती नाही ती म्हणजे एटीएस ( ATS): Application Tracking System. जवळपास ८० कंपन्या हे सॉफ्टवेअर वापरत आहेत आणि ही एक प्रकारची गाळण आहे. तुमचा रेज्युमे कितीही छान दिसत असला तरी तो एटीएसमधनं पुढे गेला नाही तर तो निवड प्रक्रियेमध्ये अडकेल आणि तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाणार नाही. याबद्दल महत्त्वाचं म्हणजे रेज्युमे फॉरमॅट निवडल्यानंतर तो शक्यतो ‘. doc’ असावा आणि मुख्य म्हणजे तो एटीएस फ्रेंडली फॉरमॅटचा असेल असं बघा. कामाची मांडणी बुलेटेड लिस्टमध्ये असणं आणि कीवर्ड्स अतिशय स्पष्टपणे लिहणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि हे झाल्यावर तुम्ही जो रेज्युमे तयार केला आहे तो एटीएस फ्रेंडली आहे का नाही हे तपासण्यासाठी Novoresume किंवा jobscan. co अशासारख्या साइटवर जाऊन तुम्ही तपासू शकता! एका नव्या पद्धतीचा रेज्युमे यापुढे लागणार आहे आणि त्याची तयारी आत्ताच केलेली बरी. त्याला ‘विडियो रेज्युमे’ म्हणतात. यात ९० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही तुमची माहिती द्यायची असते.

उत्तम रेज्युमेसाठी सध्या अनेक टूल्स आहेत आणि त्यातील काही एआय वर आधारित आहेत उदाहरणार्थ Resumaker. ai, JobProfile. io, KickResume इत्यादि.

या सर्व गोष्टीत तुम्ही ( ChatGPT चा किंवा) आता DeepSeek या चीनी tool चा कदाचित वापर कराल, हे आम्ही गृहीत धरलंय, पण लक्षात असू देत की ही ‘चीनी’ कमी वापरायची आहे आणि म्हणून आम्ही या संवादाला नाव दिलंय ‘चीनी कम!’ जेवढी ही ‘चीनी कम’ वापराल आणि स्वत:चे डोके जेवढे जास्त वापराल, तेवढी तुमच्या नोकरी मिळण्याच्या प्रयत्नात यशाची गोडी वाढेल हे नक्की!!

bhooshankelkar@hotmail.com

mkelkar_2008 @yahoo. com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aptitude test good resume social media presence ssb