Premium

BEL Recruitment 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार होण्याची संधी! लवकर भरा अर्ज; जाणून घ्या किती असेल पगार?

Sarkari Naukri 2023: भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडने(BEL) हवालदार पदासाठी भरती काढली आहे. यासाठी इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.

bel recruitment 2023
भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड ( फोटो -bel)

BEL Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटने सुवर्णसंधी घेऊ आले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटने हवालदार पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहे. जे युवा उमेदवार या पदांसाठी अर्ज करु इच्छितात ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटच्या अधिकृत वेबसाईट bel-india.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 12 पदे भरली जाणार आहेत. ही पदे त्याच्या बंगलोर युनिटसाठी कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ६ जून २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BEL भरतीची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून

BELभरतीसाठी रिक्त पदांचा तपशील

हवालदार (सुरक्षा)-12 पदे

हेही वाचा – ISROमध्ये ‘या’ पदांसाठी ३०३ जागांची होणार भरती, ५६ हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, जाणून घ्या प्रकिया

BELभरतीसाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून SSLC म्हणजेच 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवाराकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेला अनुभव असावा.

BELभरती अंतर्गत मिळणारा पगार

या पदांसाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाईल. WUG-III/CP-III त्यांना वेतन म्हणून रु. २०,५००-३%-७९,०००/- रुपये दिले जातील. तसेच CTC: रु. ५.११ लाख (अंदाजे) असेल.

अर्जाची लिंक – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Application%20form-16-05-23.pdf

अधिकृत अधिसुचना -https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=2%20English%20Security-16-05-23.pdf

हेही वाचा – इतरांपेक्षा जास्त पगाराची नोकरी हवी आहे? हे ५ आहेत बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय

BEL भरतीसाठी निवड प्रक्रिया

या पदांसाठी निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना शारीरिक सहनशक्ती चाचणी (Physical Endurance Test)उत्तीर्ण करावी लागेल. जे शारीरिक सहनशक्ती चाचणीत पात्र ठरतील त्यांना लेखी परीक्षेसाठी निवडले जाईल. उमेदवारांनी हे देखील लक्षात घ्यावे की, शारीरिक सहनशक्ती चाचणी आणि लेखी चाचणी बंगळुरू येथे घेतली जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bel recruitment 2023 for the post of havildar security for bangalore complex application last date 6 june snk