DRDO Recruitment 2023: डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गेनाइजेशन (DRDO) अनेक पदांसाठी भरती करणार आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल, तर तुम्ही DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. या पदाच्या माध्यमातून १०० पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

DRDO Apprentice Recruitment 2023: जाणून घ्या किती पदांची भरती

या भरती मोहिमेतंर्गत ग्रॅज्युएट इंजिनिअर अपरेंटिससाठी ५० पदे , डिप्लोमा अपरेंटिससाठी २५ पदे आणि ITI अपरेंटिससाठी २५ पदांची भरती सुरु झाली आहे.

DRDO Apprentice Recruitment 2023:महत्त्वाच्या तारीख

DRDO मध्ये 20 मे म्हणजेच आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे आहे.

हेही वाचा – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, ५ जूनपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

DRDO Apprentice Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट इंजिनिअर अपरेंटिस या पदाकरिता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे किमान ६.३ CGPA सह मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून किंवासंस्थेतून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ अभ्यासक्रम) असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा अपरेंटिस या पदाकरिता उमेदवाराकडे राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा / मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ (पूर्णवेळ अभ्यासक्रम) संबंधित विषयातील ६०% गुणांसह (SC/ST/PWD उमेदवारांसाठी ५०% गुणांपर्यंत सुट )असावा

ITI अपरेंटिस या पदाकरिता उमेदवाराकडे राज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून ६०% गुणांसह संबंधित शाखेत प्रथम श्रेणीसह ITI (पूर्ण वेळ अभ्यासक्रम) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – UPSC NDA 2023: युपीएससी एनडीए २ भरतीची प्रक्रिया सुरू, ३९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष

DRDO Apprentice Recruitment 2023: किती मिळेल मानधन

स्टायपेंड ग्रेजुएट अभियंता अपरेंटिस: १२,००० रुपये प्रति महिना
डिप्लोमा अपरेंटिस: ११,००० रुपये प्रति महिना
आईटीआय अपरेंटिस: १०,००० रुपये प्रति महिना

अर्जाची लिंक – https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/1782

तपशीलवार अधिकृत सूचना येथे पाहा – https://drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/AdvtARDE_GradDip17052023.pdf

DRDO Apprentice Recruitment 2023: प्रशिक्षण कालावधी

अपरेंटिसचा कालावधी शिकाऊ कायदा १९६१ नुसार १२ महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर उत्तीर्ण उमेदवारांना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drdo recruitment 2023 apply for apprentice posts selection of candidates will be made on the basis of interview snk