Premium

IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती सुरु, २० जूनपूर्वी करा अर्ज

या भरती प्रक्रियेंतर्गत बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसच्याSpecialist Cadre Officer) एकूण १३६ पदांवर भरती होईल

IDBI recruitment 2023Apply for 136 SCO posts at idbibank in
या भरती प्रक्रियेंतर्गत बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसच्याSpecialist Cadre Officer) एकूण १३६ पदांवर भरती होईल ( फोटो- IDBI official Website)

​IDBI Jobs 2023: आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर या पदाच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरती प्रक्रियेंतर्गत बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या (Specialist Cadre Officer) एकूण १३६ पदांवर भरती होईल ज्यामध्ये मॅनेजरच्या ८४ पदावर असिस्टंट, जनरल मॅनेजरच्या ४६ पद आणि डेप्युटी जनरल मॅनेजर ०६ पदांसाठी ही भरती होणार आहे.

IDBI Jobs 2023: अर्ज शुल्क किती भरावे लागेल?

या भरती मोहिमेंतर्गत अर्ज करण्यासाठी जनरल, इडब्ल्यूएसस आणि ओबीसी कॅटगरीच्या उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागले. तसेच एससी, एसटी कॅटेगरीमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क २०० रुपये भरावे लागेल. अर्ज शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगचा वापर करू शकता. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.

हेही वाचा – IBPS मध्ये मेगाभरती, तब्बल ८६०० जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कसा करावा अर्ज

​IDBI Jobs 2023: महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात : ०६-०६- २०२३
अर्ज नोंदणी बंद : २०-०६-२०२३
अर्ज संपादित करण्याची अंतिम तारीख : २०-०६-२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५-०७-२०२३
ऑनलाइन शुल्क: ०६-०६-२०२३ ते २०-०६-२०२३

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/idbiscomar23/

अधिकृत अधिसुचना https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed-Advt-Spl-23-24-May222023.pdf
https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed-Advt-Spl-23-24-May222023.pdf

हेही वाचा – १२ वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

IDBI जॉब्स 2023: अर्ज कसा करावा

पायरी 1: सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम IDBI बँकेच्या idbibank.in च्या अधिकृत साइटला भेट द्या.
पायरी 2: त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या IDBI रिक्रूटमेंट 2023 लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: नंतर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक मिळेल.
पायरी 4: त्यानंतर स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
पायरी 5: आता अर्ज फी भरा.
पायरी 6: त्यानंतर अर्ज सबमिट करा.
पायरी 7: आता अर्ज डाउनलोड करा.
पायरी 8: शेवटी, अर्जाची प्रिंट आउट घ्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Idbi recruitment 2023 apply for 136 sco posts at idbibank in snk